9 November 2024 7:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

घरात लाल मुंग्या असणे किंवा वाढणे हे कशाचे संकेत मानले जातात? - नक्की वाचा

home remedies against red ants

मुंबई, ०४ जुलै | आपल्या घरात देखील मुंग्या निघत असल्यास तर हे आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांकडे लक्ष केंद्रित करतं. घरात निघणाऱ्या मुंग्यांना आपण सहजच घेत असतो. पण हे आपल्याला भविष्याच्या घटणाऱ्या घटनांबद्दल काही न काही संकेत देत असतात.मुंग्या वरील दिशेला जात असल्यास किंवा खाली जात असल्यास या व्यतिरिक्त आपल्या घरात येणाऱ्या मुंग्यांना काही खायला मिळत आहे. किंवा नाही हे देखील बऱ्याच घटनांवर केंद्रित केलं जात.लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या वेग वेगळ्या गोष्टींचे संकेत देतात. जर आपल्या घरात काळ्या मुंग्या येत आहेत तर त्या सौख्य आणि ऐश्वर्य येण्याचे संकेत देतात.

असं म्हटलं जातं की धरतीवर जेवढा भार मुंग्यांचा आहे तेवढाच मनुष्यांचा आहे आणि मनुष्यांच्या समान संख्येत कोंबड्या आहेत. आता पुन्हा वळू या मुंग्यांवर. साधारणपणे मुंग्या दोन प्रकाराच्या असतात लाल आणि काळी. काळ्या मुंग्या शुभ मानल्या गेल्या आहेत परंतू लाल नाही.

लाल मुंग्यांबद्दल म्हणतात की घरात लाल मुंग्यांची संख्या वाढल्यास कर्ज वाढतं. आणि लाल मुंग्या संकटाचे संकेत आहे. अशात लोकं मुंग्या मारण्यासाठी औषध टाकतात. अशात त्यांच्यावर हत्या दोष लागतो म्हणजे सरळ भाषेत म्हणायचं तर एका संकटापासून वाचण्यासाठी दुसर्‍यात संकट ओढणे. अनेकदा लाल मुंग्या मारण्यासाठी केलेल्या उपायामुळे काळ्या मुंग्याही मरतात. अशात काय करावे हा प्रश्न आपल्या मनात निश्चितच उद्भवत असेल…

तर जाणून घ्या लाल मुंग्यांना मारण्यासाठी अहिंसक उपाय:
* लाल मुंग्यांना कोणत्याही प्रकाराच्या कीटनाशक वापरू नये. आपल्या घरात लिंबू तर असेलच. लिंबाला जरा सोलून म्हणजे काही सालं काढून त्याचे तुकडे करावे आणि हे तुकडे लाल मुंग्या असतील त्या ठिकाणी ठेवून द्यावे. काही वेळातच मुंग्या तिथून नाहीश्या होतील.
* दुसरा उपाय म्हणजे आपण तेजपानाचे तुकडे करून देखील मुंग्या असलेल्या ठिकाणी ठेवू शकतात.
* किंवा लवंग आणि काळी मिरीदेखील वापरू शकता.
* तसेच मुंग्यांमुळे कर्ज मुक्ती होते. त्यासाठी एक उपाय आहे की दोन्ही प्रकाराच्या मुंग्यांना कणीक टाकल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. मुंग्यांना साखर मिसळून कणीक टाकल्याने व्यक्ती प्रत्येक बंधनातून मुक्त होतो. हजारो मुंग्यांना दररोज आहार दिल्याने मुंग्या संतुष्ट होतात आणि यामुळे मनुष्य प्रत्येक संकटातून बाहेर पडतो.
* तर मुंग्यांना कणीक देण्याने आणि लहान-लहान चिमण्यांना तांदूळ खाऊ घालणारे वैकुंठात जातात असे ही मानले गेले आहे. तसेच ऋणमुक्तीसाठी मुंग्यांना कणीक आणि साखर टाकावी.
* शेवटी मुंग्यांबद्दल एक शगुन सांगायचे म्हणजे लाल मुंग्यांना ओळीत जात असताना मुंग्यांच्या तोंडात अंडी असलेले बघणे शुभ असतं. याने संपूर्ण दिवस शुभ आणि सुखात जातो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x