9 November 2024 6:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

‘फ्लाइंग सिख’ | जीवनाच्या शर्यतीत मिल्खा सिंग यांची अनंताकडे धाव

Milkha Singh Passes Away

मुंबई, १९ जून | महान धावपटू ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग (९१) यांचे शुक्रवारी रात्री ११:२४ वा. रुग्णालयात निधन झाले. कोरोनामुक्त झाल्यानंतर मिल्खा घरी परतले होते. ३ जूनला त्यांना पुन्हा पीजीआयमध्ये भरती केले होते. कोरोनावर उपचार सुरू असताना त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचेही १३ जूनला निधन झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आपण एक महान खेळाडू गमावला.

काही दिवसांपूर्वीच त्यांच्याशी बोलणे झाले होते. हा शेवटचा संवाद असेल, असे वाटले नव्हते.’ २० नोव्हेंबर १९२९ ला पाकिस्तानाच्या फैसलाबादेत जन्मलेले मिल्खा १९४७ मध्ये दंगलींतून जीव वाचवून भारतात आले. यानंतर ते १९६० मध्ये पहिल्यांदा पाकला गेले. तेथे त्यांना ‘फ्लाइंग सिख’ची उपाधी देण्यात आली होती.

पंतप्रधान मोदी वाहली श्रद्धांजली:
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल ट्विटरवरुन महान धावपटू मिल्का सिंग यांना श्रद्धांजली वाहली आहे. पंतप्रधान म्हणाले की, आम्ही एक महान खेळाडू गमावला आहे. मिल्खाने असंख्य भारतीयांच्या हृदयात एक विशेष स्थान कोरले होते. मिल्खाच्या व्यक्तिमत्त्वाने त्यांना लाखो लोकांचे आवडते बनविले. त्यांच्या मृत्यूमुळे मी दु: खी आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x