मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नव्हता – महापौर
मुंबई, ०९ जून | मुंबईसह ठाण्यात 9 ते 12 जूनपर्यंत अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने आधीच दिला होता. त्यामुळे मुंबईला अतिवृष्टीचा अधिक फटका बसू नये म्हणून महापालिकेने तयारी केली होती. मात्र, आज सकाळपासून पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावत मुंबईची दाणादाण उडवून दिली. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे सायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.
सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 9 वाजून 50 मिनिटांनी अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, लोकल ठप्प झाल्याने चाकरमानी चांगलेच वैतागले आहेत.
#WATCH | Maharashtra: Severe waterlogging at Kings Circle in Mumbai, due to heavy rainfall. #Monsoon has arrived in Mumbai today. pic.twitter.com/PI2ySwhBCR
— ANI (@ANI) June 9, 2021
दरम्यान, मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नाही. मात्र, चार तासात निचरा झाला नाही तर मात्र आरोप योग्य आहे, असं मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं आहे. आज त्या माध्यमांशी बोलत होत्या. चार तासाच्या वर पाणी शहरात थांबत नाही, त्यामुळे थोडं थांबणं गरजेचं असल्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “पावसाचं पाणी शहरात भरणारच नाही असा दावा कोणीही कधीच केला नव्हता. समुद्राचे दरवाजे बंद, सतत पाऊस सुरु यामुळे पाणी भरणार..पुण्यातही तुंबलं आहे. पण चार तासाच्या वर शहरात पाणी राहत नाही. आत्ताही काही भागांमध्ये पाणी साचलेलं नाही, पाण्याचा निचरा झालेला आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, पूर्वी पावसामुळे चार- पाच दिवस मुंबई ठप्प व्हायची पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आम्ही मुंबईतल्या सर्व भागांवर लक्ष ठेवून आहोत. ज्या ठिकाणी निष्काळजीपणा दिसेल तिथे त्वरीत कारवाई करत आहोत. गेल्या वर्षीपासून मनुष्यबळ विस्कळीत झालं आहे. मात्र हे कारण आम्ही देणार नाही. मुंबईत चार तासांहून अधिक काळ पाणी साचणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ..
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO