9 November 2024 7:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली | 11 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर

Building collapsed

मुंबई, 10 जून | मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी (9 जून) रात्री 11 वाजता ही दुर्घटना घडली. मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे.

मुंबई शहरचे पालकमंत्री आणि मालाडचे आमदार अस्लम शेख यांनी दुर्घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळाला भेट दिली. मदतकार्याचा आढावा घेतला. हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x