9 November 2024 7:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

VIDEO | मी २५ दिले होते, ५० महाजनला द्यायला सांगितलेत | RTO घोटाळ्याचा दीड वर्षापूर्वीचा व्हिडिओ

Nandurbar RTO scam

नंदूरबार, २३ जून | राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार होत असल्याच्या प्राप्त झालेल्या तक्रारीने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. मात्र नाशिक पोलिसांच्या चौकशीअंती याबाबतचा कुठल्याही प्रकारचा गुन्हा शहर आयुक्तालयाच्या हद्दीत घडला नसल्याचे प्रशासनाने मंगळवारी (दि.22) स्पष्ट केले आहे.

नंदूरबारचे डेप्युटी RTO नानासाहेब बच्छाव टेबलवर मोठी रक्कम ठेवून बोलत काही जणांशी बोलत असतानाचा हा व्हिडिओ आहे. कनिष्ठ आरटीओ खडसे आणि भोई यांच्याकडून पैशाचा कथित हिशोब ते मागत असल्याचे दिसते. बच्छाव यांनी तो पैसा स्वीकारलेला नाही, पण १० लाख रुपयांची मागणी करताना दिसतात. हा व्हिडिओ दीड वर्षापूर्वीचा असला तरी आरटीओतील घोटाळ्यांच्या निमित्ताने त्याची चर्चा सुरू झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्याच एका सहकाऱ्याने तयार केला होता. ‘हा व्हिडिओ म्हणजे माझ्याविरुद्धचा कट आहे. तो मोडूनतोडून तयार केलेला आहे’, असे बच्छाव यांचे म्हणणे आहे.

राज्याच्या मंत्र्यांपासून उच्चपदस्थ अधिकारी वर्गांपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप करणारी तक्रार आरटीओचे निलंबित मोटार निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीची गंभीरपणे दखल घेत पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x