9 November 2024 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

आमचा लढा सरकारविरोधात नाही, समाजाच्या न्याय हक्कासाठी | ही अराजकीय चळवळ - संभाजी छत्रपती

sambhaji chhatrapati

कोल्हापूर, ०६ जून | आमची चळवळ अराजकीय आहे. कोणत्याही पक्षाचा त्याच्याशी संबंध नाही. आमचा लढा सरकारविरोधात नाही. समाजाच्या न्याय हक्कासाठी आमचा लढा आहे, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी आज स्पष्ट केलं.

रायगडावरून आंदोलनाची घोषणा केल्यानंतर संभाजी छत्रपती यांची सकल मराठा संघटनेच्या नेत्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. आमचा कुणालाही विरोध नाही. आमच्या मागण्याही साध्या आहेत. त्यावर मी उपायही दिले आहेत. आम्ही पाच मागण्या दिल्या आहेत. त्याच भोसले समितीने सांगितल्या आहेत.

आम्ही सांगितलेल्या पाच मागण्यापूर्ण करण्यासाठी कोर्टाची गरज नाही. त्या सरकारने लागू कराव्यात. आमचा लढा सरकारविरोधात नाही. समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. आमच्या आंदोलनात यायला कोणालाही अटकाव नाही. आमची अराजकीय चळवळ आहे. मराठा समाजाला न्याय मिळून देण्याचा आमचा उद्देश आहे. यापेक्षा कोणताही उद्देश नाही, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x