महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | व्हाट्सअॅप स्टेटस 'थांबलास तर कोयता आणि पळालास तर गोळी | पोलिसांकडून अटक सत्र
तरुणांमध्ये सध्या व्हाटसअँप स्टेटसचं क्रेझ प्रचंड वाढलंय. मात्र त्यातून धक्कादायक प्रकार देखील सुरु झाले आहेत. शहरात स्वत:ची दहशत निर्माण करण्यासाठी व्हाट्सअॅप स्टेटसला तलवारी आणि बंदूकीचे व्हिडीओ ठेवून सर्वसामान्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. इचलकरंजी शहरात अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांविरोधात पोलिसांनी मोहिमच सुरु केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | सासुसोबतच्या वादातून तिने स्वतःच्या चिमुकल्याला अमानुषपणे मारलं | तिला मनसे गाठलं अन...
काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओ एक निर्दयी आईला स्वत:च्या चिमुकल्याला अमानुष मारहाण करत होती. हा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट झाल्यापासून नेटिझन्सकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. सासुसोबत सुरू असलेल्या घरगुती वादातून एका महिलेने तिच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण केली.
3 वर्षांपूर्वी -
Rain Alert | मान्सून पुण्यात दाखल, अपेक्षेपेक्षा लवकर राज्य व्यापणार
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पाऊस अखेर पुण्यात दाखल झाला आहे. मान्सूनचा पाऊस शनिवारी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून (राज्यभरात वेगाने आगेकूच करत आहे. कोकण परिसरात मान्सून अलिबागपर्यंत पोहोचला आहे. मान्सूनचा सध्याचा वेग पाहता तो अपेक्षेपेक्षा लवकर राज्य व्यापेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
त्यांना कामधंदा नाही म्हणून रोज ती एकच गोष्ट उकरून काढत आहेत - अजित पवार
अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करणं ही चूक होती, अशी कबुली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अजितदादांना सत्ता स्थापन करता येते, पण टिकवता येत नाही, असं सांगत निशाणा साधला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पलटवार केला आहे. विरोधकांना काही कामधंदा नाही. त्यामुळे ते ती गोष्ट उकरून काढत आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोलकाता येथील भाजप कार्यालयाजवळ 51 क्रूड बॉम्ब आढळले | पोलिसांकडून बॉम्ब हस्तगत
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधून 51 क्रूड बॉम्ब म्हणजेच देशी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. हे बॉम्ब खिदिरपूर चौकाजवळ एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये सापडले. याबाबत माहिती मिळताच बॉम्ब स्कॉड घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, जिथे बॉम्ब आढळले, ती जागा भाजप कार्यालयाच्या जवळच आहे. हे बॉम्ब ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | रस्ता ओलांडण्यासाठी तरुण आला | अचानक समोरून लहान मुलगी आली आणि..
रस्त्यावर चालत असताना कधी काय अपघात घडेल याची खात्री देता येणार नाही. कधी कसा आणि कुठल्या कारणाने अपघात होईल ते सांगता येणार नाही. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये देखील असंच काहीसं झालं आहे. या व्हिडीओमध्ये कोणत्याही वाहनांचा विचार न करता छोटी मुलगी रस्ता ओलांडत असल्याचे दिसतेय. हा सर्व प्रकार छोट्या मुलीच्या समोर उभा असलेल्या तरुणाच्या लक्षात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोदींची हिटलरशी तुलना अयोग्य, हिटलरच्या काळात जर्मनी आर्थिक महासत्ता बनला होता - नितीन राऊत
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतीच अर्थव्यवस्था प्रभावित झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 या वर्षातील जीडीपी नुकतीच जाहीर केलीय. त्यानुसार भारताच्या जीडीपीत 7.3 टक्क्यांची घट दिसून आली आहे. गेल्या चार दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचं सांगितलं जात आहे. मागील आर्थिक वर्षात ही घट 4 टक्के होती.
3 वर्षांपूर्वी -
Rain Alert | शेतकऱ्यांसाठी सुखद बातमी, मान्सून महाराष्ट्रात दाखल
शेतीची मशागत करुन पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. हवामान खात्यानं याची घोषणा केलीय. त्यामुळे शेतीत पेरणी करुन मान्सूनच्या पावसावर पिक फुलवण्यासाठी शेतकऱ्यांची तगमग वाढणार आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यानं कोकणातील हर्रे परिसरात प्रवेश केलाय. सोलापूर मराठवाड्याच्या संलग्न भागात मान्सून दाखल झालाय
3 वर्षांपूर्वी -
केंद्राकडून 'या' महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा | काळजी घेण्याचा सल्ला
कोरोना व्हायरसची दुसरी लाट आता काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे. पण कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकराक आहे. कारण देशात तिसऱ्या लाटेचे संकेत दिले आहेत. नीती आयोगाचे सदस्य व्ही.के सारस्वत यांच्या म्हणण्यानुसार आपण कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात यशस्वी ठरलो आहोत. पण आता कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेतून बाहेर येण्यासाठी योग्य ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
3 वर्षांपूर्वी -
ब्लु-टिक मुळे मोदी सरकार लालबुंद झालं | केंद्राची ट्विटरला इशारा देणारी शेवटची नोटीस
आज सकाळपासून ट्विटरकडून केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या ट्विटर हँडलवरची ‘ब्लू टिक’ हटवली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या ट्विटर अकाउंटवरची ब्लूट टिक हटवण्यात आली आहे. त्यासोबतच, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या खात्यावरची ब्लू टिक देखील हटवण्यात आली आहे. संघाशी संबंधित इतरही काही व्यक्तींच्या अकाउंटची ब्लूट टिक काढण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
ब्लु-टिक गेली | २०१९ मध्ये ट्विटरवर इंट्री | ६ महिन्याहून अधिक काळ ना लॉगइन ना एकही ट्विट
केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत. ट्विटरकडून केल्या जात असलेल्या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्ल्यू टिक हटवल्यानंतर आता ट्विटरने आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही - संजय राऊत
तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न राज ठाकरे यांना लोकसत्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा सवाल करण्यात आला होता. तेव्हा, म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणालो, अशी हजरजबाबी प्रतिक्रियाही राज यांनी दिली होती.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे मोदींशी चांगले संबंध | मुश्रीफ यांचा दावा | दाव्यातील सत्य सांगणारा व्हिडिओ..
बँकांना कोट्यवधी रुपयांना ठकवून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चौक्सीवरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी धक्कादायक विधान केलं आहे. नीरव मोदी आणि चोक्सीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळेच या दोघांवर कारवाई केली जात नाही, असं धक्कादायक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | रायगडचे आगरी डेंजर, घरात कोयते ठेवतात, एअरपोर्टला नाव द्यायला आले तर परत जाणार नाहीत - भाजप नगरसेवक
नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या मुद्यावरुन वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बाळासाहेबांविषयी एकेरी शब्द वापरत बदनामीकारक वृत्त खाजगी युट्यूब चॅनलवरुन प्रसारित केल्याप्रकरणी पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | विजांच्या कडकडाटासह मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचा IMD चा इशारा | अनेक भागात पाऊस
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई वेधशाळेने पुढील तीन तासात नांदेड, परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस आणि वीज देखील कोसळू शकते, असा अंदाज वर्तवला आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. परभणी जिल्ह्यात सकाळपासून मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे. गडचिरोलीमध्येही पहाटेच्या सुमारास पाऊस झाला.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | पिंपळाला लागलाय आंबा? | व्हिडीओ'मागील सत्य समोर आलं
तुम्ही कधी पिंपळाच्या झाडावर आंबा पाहिलाय? नाही ना? पण समाज माध्यमांवर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. पिंपळाच्या झाडावर आंबा लागल्याचा दावा व्हिडीओसोबत केला जात आहे. हा व्हिडीओ उत्तराखंडच्या ऋषीकेशमधील असल्याचा दावा आहे. ऋषीकेशच्या त्रिवेणी घाटाजवळ असलेल्या पोलीस चौकीजवळील पिंपळाच्या झाडावर तीन आंबे पाहिल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे, असा मजकूर व्हिडीओसोबत आहे.
3 वर्षांपूर्वी -
अदिती चांगलं काम करतेय | पै-पै विकास कामासाठी खर्च झाले पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
अदिती चांगलं काम करत आहे, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण राज्यमंत्री अदिती तटकरे यांचं कौतुक केलं. अदिती तटकरे यांचे काम चांगले आहे, त्या जर कमी पडल्या तर त्यांचे वडील म्हणजेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे कामं करुवून घेतात, असं अजित पवार म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
WhatsApp चे नवीन फीचर आले | कोणते युजर्स करू शकतील वापर?
WhatsApp Business यूजर्ससाठी काही खास आणले आहे. या फीचरच्या मदतीने बिजनेस युजर्स सहज स्टिकर्स सर्च करू शकतील. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp ने Android बीटा यूजर्ससाठी सर्च फॉर Stickers शॉर्टकट फीचर लाँच केले आहे. WhatsApp चे लेटेस्ट 2.21.12.1 व्हर्जन यूजर WhatsApp बीटा यूजर्सला कीबोर्ड स्टिकर्स शॉर्टकट दिले गेले आहे. सध्या WhatsApp बीटा वर्जनचे Stickers सर्च टेस्टिंग फेज मध्ये आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | मुंबईतील ओशिवरा येथील आशियाना टॉवर या रहिवासी इमारतीला मोठी आग
आज सकाळच्या सुमारास ओशिवरा येथील आशियाना टॉवर या रहिवासी इमारतीला मोठी आग लागली. आगीचे वृत्त समजल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग शमवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त आलेले नाही.
3 वर्षांपूर्वी -
पोलीस भरती प्रशिक्षण | लेखी परीक्षेचा सराव | रोज ऑनलाईन प्रश्न सोडवा | मित्रांनाही जोडा | पेपर 1.1
पोलीस भरतीची तयारी करताय? | करा सराव लेखी परीक्षेचा | द्या या प्रश्नांची उत्तरं. कारण लेखी परीक्षेतच तुमचा मार्ग सोपा होणार की कठीण ते जवळपास निश्चित होतं. त्यामुळे शारीरिक चाचणीच्या सरावासोबत लेखी परीक्षेचा सराव करणं अत्यंत महत्वाचं असतं.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO