13 November 2024 1:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

अभिमानास्पद | जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी सोलापूरच्या डिसले गुरुजींची नियुक्ती

Ranjit Singh Disley Guruji

सोलापूर, ०३ जून | सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील डिसले गुरुजींनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवला अन् त्यांचं आयुष्यच बदलून गेलं आहे. काही दिवसांपूर्वी गुरुजींच्या नावाने स्कॉलरशीप सुरू करण्यात आली होती. तसेच, ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वरही त्यांची नेमणूक करण्यात आली. आता जागितक बँकेच्या शिक्षण सल्लागार समितीवरही त्यांना नेमण्यात आलं आहे. त्यामुळे, एका जिल्हा परिषदेच्या गुरुंजींनी गगनभरारीच घेतल्याचं दिसून येतंय.

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या कामात आता झेडपीच्या गुरुजींचं योगदान असणार आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत रणजितसिंह डिसले शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x