13 November 2024 1:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

ब्लु-टिक गेली | २०१९ मध्ये ट्विटरवर इंट्री | ६ महिन्याहून अधिक काळ ना लॉगइन ना एकही ट्विट

Twitter Blue Tick

नागपूर, ०५ जून | केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत. ट्विटरकडून केल्या जात असलेल्या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्ल्यू टिक हटवल्यानंतर आता ट्विटरने आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली आहे.

ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या पर्सनल अकाऊंटला असलेली ब्लू टिक काढली होती. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. दोन तासांनतर ट्विटरने आपली चूक सुधारली आणि नायडूंचे पर्सनल अकाऊंट व्हेरिफाईड करण्यात आले आहे. त्यामुळे ब्लू टिक पुन्हा दिसू लागली. यानंतर आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटवरील ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे.

सहा महिने अधिक कालावधीपासून अकाऊंटमध्ये लॉगइन केले नाही, तर ब्ल्यू टिक हटवण्याविषयीच्या धोरणाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मोहन भागवत यांचे मे २०१९ मध्ये ट्विटरवर अकाऊंट ओपन करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या अकाऊंटवर एकही ट्विट दिसत नसल्याचे सांगितले जात आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x