9 November 2024 7:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

उत्तर प्रदेश | कानपूरमध्ये बस आणि टॅम्पोच्या धडकेमध्ये १७ जणांचा मृत्यू, ४ जण गंभीर जखमी

Kanpur Road Accident

कानपूर, ०९ जून | उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे बस आणि टॅम्पोच्या धडकेमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी ,रात्री साडे आठच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सचेंडी पोलिसांनी दिली आहे. जखमींना लाला लजपत राय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

प्रत्यदर्शींच्यामते हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर संपूर्ण महामार्गावर मृतदेह इतरत्र पडलेले दिसत होते, तर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकादेखील कमी पडल्या होत्या. त्यामुळे जखमींना टेम्पो आणि अन्य गाड्यांमधून हॅलेट रुग्णालयात पोहोचवण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी लोडरच्या माध्यमातून अनेक जखमींना रुग्णालयात पोहोचवलं.

महामार्गावर DCM चा ड्रायव्हर बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता आणि यादरम्यान टेम्पो आणि बसचा अपघात झाला. या अपघातात जितक्या लोकांचा मृत्यू झालाय ते सर्व टेम्पोमध्ये होते. हे सर्व कानपूरच्या सचेंडी पोलीस ठाण्याहद्दीतील लाल्हेपुर गावातील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व एका बिस्किट फॅक्टरीमध्ये काम करत होते आणि नाईट शिफ्टमध्ये काम करण्यासाठी फॅक्टरीत जात होते.

 

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x