9 November 2024 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

जाणून घ्या तुमच्या बेंबीच्या आकार काय सांगतो? | काय असतात त्याचे अर्थ? - नक्की वाचा

Belly button your personality

मुंबई, ०४ जुलै | तुमच्या शरीराच्या विविध भागांवर असलेले तिळंही तुमच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये कथन करतातच सोबत तुम्हाला शुभ-अशुभाचे संकेतदेखील मिळतात. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या बेंबीचे देखील आकार वेगवेगळे असतात आणि त्यामागे देखील काही अर्थ लावले जातात. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. यामध्ये कोणाचेच दुमत नसेल.तुमच्या डोळ्यांचा रंग, ओठांचा आकार, चेहऱ्याची ठेवण तुमच्या स्वभावाविषयी बऱ्यात काही गोष्टी सांगत असते. आपण या विषयी वेळोवेळी जाणून घेतले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का?तुमच्या बेंबीचा अर्थात नाभीचा आकार तुमच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू दर्शवत असतो. तुमच्या नाभीकडे तुम्ही कधी नीट निरखून पाहिले आहे का? प्रत्येकाच्या नाभीचा आकार हा वेगळा असतो. यानुसार त्याव्यक्तिमध्ये काही स्वभावदोष असतात. चला जाणून घेऊया तुमच्या बेंबीचा आकार नेमकं तुमच्याविषयी काय सांगतो.

मोठी खोल नाभी:


काही जणांच्या बेंबीच्या आकार हा खोल आणि गोल असतो. अशी नाभी असलेले लोकं उदार मनाचे असतात. प्रत्येक गोष्टी नेटाने पूर्ण करण्यात या लोकांचा हातखंडा असतो. अत्यंत समजूतदार स्वभावाच्या या व्यक्ती असतात.समजूतदार स्वभाव असल्यामुळे ही लोक फार सहनशील असतात. खोल आणि मोठी नाभी असलेल्या व्यक्तींचा स्वभाव हा सरळ असतो. त्या अजिबात आडपडदा ठेवत नाहीत.आयुष्यात मिळालेल्या अनुभवाचा उपयोग ते इतरांसाठी मार्गदर्शन करुन करतात.

उभट प्रश्नचिन्ह स्वरुपातील नाभी:


काहींची नाभी ही अगदी पातळ आणि उभट असते. त्यांना नाभी आहे की नाही हे देखील अजिबात कळत नाही. अशा नाभीला प्रश्नचिन्ह आकारातील नाभी असे म्हटले जाते. ही लोकं अत्यंत आळशी स्वभावाचे असतात. एखादे काम पूर्ण करताना सतत त्यांचा आळस समोर येतो. असा नाभीचा आकार शरीरात कमी असलेली उर्जा दर्शवतो. अशी बेंबी असलेल्या व्यक्ती या त्यांच्या आवडीच्या कामात निपूण असतात. एखाद्या यांत्रिक कामापेक्षा त्यांना स्वत:हून करता येतील अशी काम करायला खूपच आवडतात.

धनुष्याकृती नाभी:


काही जणांच्या नाभीचा आकार हा धड आडवा ना धड अंडाकडती असतो. अशी नाभी ही धनुष्याकृती आकाराची असते. त्या कर्तृत्ववान असतात. स्वत:च्या हिंमतीवर सगळे काही मिळवावे असे या लोकांना आवडते म्हणूनच अशा व्यक्ती या चारचौघातही उठून दिसतात. अगदी कोणतीही परिस्थिती आली तरी त्याचा सामना कसा करायचा हे या लोकांंना माहीत असते. या व्यक्ती फार हुशार असतात या अगदी सहजपणे कोणावरही विश्वास ठेवत नाहीत. त्यांना तसा विश्वास ठेवायला मुळीच आवडत नाही.

अंडाकृती नाभी:


अंडाकृती नाभी असलेल्या व्यक्ती या फार विचार करणाऱ्या असतात. एखादी गोष्ट चुकीची घडली की, त्याच्या वेदनाही हीच लोक सहन मनातल्या मनात सहन करत राहतात. त्यांना या गोष्टी इतरांना सांगायला मुळीच आवडत नाही. खूप विचारी असल्यामुळे कधी कधी या व्यक्ती आलेली चांगली संधी देखील गमावतात. एखाद्या नव्या गोष्टीबद्दल जाणून घेणे या लोकांना फार आवडते. त्यामुळे नव्या गोष्टींची उत्सुकता त्यांना फार असते. अशा गोष्टींमध्ये ते चांगले रमतातही. पण कधी कधी त्यांचा विचारी स्वभाव या सगळ्यावर पाणी फेरतो. अशा व्यक्तींनी अति विचारात रमू नये.

उथळ नाभी:


काहींची नाभी ही फारच लहान असते. लहान आकारापेक्षाही ती फार उथळ असते. त्यांचा आतला भाग हा पटकन दिसून येतो. अशा उथळ नाभी असलेल्या महिला या फार चिडचिड्या स्वभावाच्या असतात. त्यांना कोणत्याही गोष्टीचा राग पटकन येतो. राग अगदी त्यांच्या नाकावरच असतो, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. महिलांची नाभी अशा पद्धतीने उथळ असेल तर त्या आपल्या कामात फारशा निपूण नसतात. घिसडघाईने काम करण्याची त्यांची सवय असल्यामुळे ती काम यशस्वी होत नाही. पण जर पुरुषाची नाभी अशी उथळ असेल तर असे पुरुष हे बुद्धिवान, कुशल आणि स्पष्टवादी असतात. कोणतेही नाते मनापासून सांभाळायला त्यांना आवडते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: What your belly button says about your personality article news updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x