16 April 2025 5:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL
x

Business Idea | कमी पैशांत स्वस्तात मस्त व्यवसाय सुरू करायचा आहे, हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा, दररोज कमाई होईल

Business Idea

Business Idea | आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. अशातच भारतातील शहरी भागांकडे लोकांची जास्त गर्दी पाहायला मिळते. शिक्षण, मोठमोठ्या कंपन्या, मेडिकल किंवा आणखीन उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असणारे महाविद्यालय, त्याचबरोबर इतरही छोट्या मोठ्या कंपन्या शहरी भागांकडेच जास्त प्रमाणात पाहायला मिळतात.

अशा परिस्थितीत ग्रामीण भागाकडून शहरी भागांकडे स्थलांतर करणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एवढंच नाही तर, बहुतांश व्यक्ती कामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे भाड्याने रूम घेऊन राहतात. दरम्यान एका व्यक्तीचे जेवण करून अभ्यास किंवा बाहेरील काम करणे अशक्य होऊन जाते. अशावेळी विद्यार्थी वर्ग किंवा इतर व्यक्ती एखाद्या खानावळीमध्ये किंवा होम फूड सर्व्हिस सेंटरमध्ये प्रत्येक दिवसाला जेवणाचा डबा लावतात.

तुम्ही सुद्धा सुरू करू शकता टिफिन सर्विस व्यवसाय :

अशा परिस्थितीत बहुतांश महिला अशाही आहेत ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे. बऱ्याच गृहिणींच्या हाताला भारीच चव असते. त्यांचे जेवण, डाळी, भाज्या आणि इतरही व्यंजने अतिशय रुचकर असतात. तुमच्या सुद्धा हाताला रुचकर मेजवानीची चव असेल तर, तुम्ही घरच्या घरी टिफिन सर्विस व्यवसायाला सुरुवात करू शकता. भाड्याने घर घेऊन राहणारे विद्यार्थी त्याचबरोबर कामानिमित्त शहरी भागांकडे वळणार यांची संख्या डब्यांसाठी जास्त पाहायला मिळते.

व्यवसाय सुरू करण्यासाठी केवळ दोन ते तीन माणसांची गरज :

टिफिन सर्विस व्यवसाय अतिशय स्वस्तात मस्त चालणारा व्यवसाय आहे. त्याचबरोबर गृहिणींना जेवण बनवण्याची सवय असते. त्यामुळे त्यांना दररोज जेवण बनवून लोकांना खाऊ घालण्यात कोणत्याही प्रकारचे कष्ट किंमत त्रास वाटत नाही. हे काम त्या आवडीने करतात. त्याचबरोबर जर, तुम्ही घरच्या घरी तुमच्या आईला किंवा बहिणीला हाताशी घेऊन या व्यवसायाची सुरुवात केली तर, लवकरात लवकर तुम्ही लखपती बनू शकता.

कोण कोणत्या गोष्टींची गरज भासेल :

आता टिफिन सर्विस सुरू करायचा म्हटल्यावर तुम्हाला सर्वप्रथम दोन प्रकारच्या शेगड्या लागतील. त्यानंतर मोठमोठी जेवण बनवण्याची भांडी देखील लागतील. त्याचबरोबर तुम्हाला मार्केट नॉलेज देखील जाणून घ्यावे लागेल. एवढेच नाही तर, स्वस्त दरात म्हणजेच होलसेल भावाने भाज्या, फळ त्याचबरोबर इतरही ग्रोसरी कुठे मिळते याची पुरेपूर माहिती काढून घ्यावी लागेल. तुमच्या व्यवसायाचा एकदा जम बसला की, तुम्ही ग्रोसरी दुकानदाराशी चांगली डील देखील करू शकता आणि जास्तीत जास्त स्वस्त दरात सामान्य मिळवू शकता.

किती पैसे कमवता येतील :

तुम्ही घरगुती टिफिन सर्विसच्या माध्यमातून दिवसाला 3 ते 4 हजार रुपयांची कमाई करू शकता. व्यवसाय छोटा जरी असला तरी तुम्हाला चांगली मिळकत मिळू शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या टिफिन सर्विसमध्ये व्यंजनांची कॉलिटी चांगली ठेवावी लागेल. परंतु जास्त हाय फाय जेवण ठेवून चालणार नाही. कारण की, टिफिन सर्विस घेणाऱ्या व्यक्ती या सर्वसामान्यच असतात. त्यांना परवडेल अशा दरामध्ये तुम्ही त्यांना चविष्ट व्यंजने चांगल्या दरामध्ये बनवून दिली तर, तुमचे कायमचे ग्राहक बांधल्या जातील. अशा पद्धतीने तुमचा व्यवसाय तूफान चालेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Business Idea Friday 03 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Business Idea(92)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या