17 April 2025 11:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

Business Idea | पोस्ट ऑफिस तरुणांसाठी घेउन येत आहे मोठी संधी, पोस्ट ऑफिसबरोबर स्वतःचा उद्योग सुरु करण्याची संधी

India Post Doorstep Service

Business Idea | पोस्ट ऑफिसची व्याप्ती दिवसागणीक वाढत चालली आहे. आपल्या देशात सध्याच्या घडीला १.५५ लाख पोस्टाची कार्यालये आहेत. पोस्ट ऑफिस आपल्या सेवेत आणखीन सुधारणा करत आहे. यासाठी अतिरीक्त १० हजार पोस्ट ऑफिस येत्या काही दिवसांत सुरू केली जाणार आहेत. अशी माहिती पोस्ट विभाग सचिव अमन शर्मा यांनी दिली. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करुण यात सेवा अधिक जलद पुरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रत्येक ५ किलोमीटरच्या अंतरावर ही पोस्टाची कार्यालये सुरू होत आहेत. यासाठी कामे देखील सुरू करण्यात  आली आहेत.

फक्त ५००० रुपयांच्या गुंतवणूकीतून स्वत:चे पोस्ट ऑफिस
पोस्ट ऑफिस सध्या फ्रेंचायजी स्वरुपात काम करत आहे. त्यामुळे घरी बसून देखील पोस्ट ऑफिस उघडने शक्य आहे. पोस्ट ऑफिसबरोबर व्यवसाय करण्याची ही सुवर्ण संधी आहे. लाखो तरुण यात स्वत:चे पोस्ट ऑफिस खोलू शकतात. सर्वसामान्य मुलांना देखील हे शक्य आहे. यात सुरुवातीला तुम्हाला फक्ता ५ हजारांची गुंतवणूक करावी लागेल. या फ्रेंचायजीचा फायदा ग्रामीण भागात जास्त होणार आहे. कारण गावाकडे आजही अनेक जण पोस्टाचा जास्तीत जास्त उपयोग करतात. त्यामुळे गावातील तरुणांना याचा रोजगारासाठी जास्त फयदा होईल.

दोन फ्रेंचायजीचे पर्याय आहेत उपलब्ध
फ्रेंचायजीचे दोन्ही प्रकार खुप फायद्याचे आहेत. यात फ्रेंचायजी आउटलेट आणि एजंट या दोन प्रकारे काम चालते. ज्या ठिकाणी पोस्ट ऑफिस नेटवर्क नाही मात्र टपालाची गरज आहे तिथे तुम्ही आउटलेट सुरू करू शकता. तसेच एजंटचा पर्याय निवडला तर तुम्हाला यात प्रत्येक सेवेसाठी कमिशन दिले जाते. तसेच एजंट मुद्रांक शुल्कही विकतात.

फ्रेंचायजी आउटलेटमध्ये काउंटरवर देखील ही सेवा पुरवता येते. यात इंडिया पेस्टचे डिलिव्हरी तसेच ट्रान्समिशनचे स्वत:चे नेटवर्क असावे लागते. तसेच ई-पोस्ट, मनी ऑर्डर आणि पार्सल या सेवा दिल्या जातात. मनीऑर्डर किमान  १०० रुपयांची असने गरजेचे आहे. त्यापेक्षा कमी असल्यास ती स्वीकारली जात नाही. या सर्व सेवा जर तुम्ही पुरवल्या तर त्यावर पोस्ट ऑफिस कमिशन देते.

पात्रता कशी आहे
या फ्रेंचायजीसाठी किमान वय १८ असावे. तसेच कोणत्याही मोठ्या पदवीची यात गरज नाही. ८ पास एवढे शिक्षण अनिवार्य आहे. तसेच पोस्टाकडे तुम्हाला सुरूवातीला ५ हजार रुपये डिपॉझिट ठेवावे लागतील. फ्रेंचायजी उघडण्यासाठी तुम्हाला विभाग प्रमुखांना अर्ज करावा लागेल. त्यावर १४ दिवसांमध्ये तुम्हाला पत्रा द्वारे कळवले जाईल. तसेच यात पगार दिला जाणार नाही. या फ्रेंचायजीमध्ये फक्त कमिशन स्वरूपात पैसे मिळतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Business Idea India Post Doorstep Service Post office is bringing great opportunity for youth 29 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

India Post Doorstep Service(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या