Business Idea | व्यवसाय करायचा विचार करताय?, प्रचंड मागणी असलेली अटर्ली-बटर्ली अमुल फ्रेंचायजी देईल मजबूत पैसा
Business Idea | आमुल दूध पीत है इंडिया, अटर्ली, बटर्ली अमुल अशा अनेक जाहिरातींनी अमुल या कंपनीने भारतात आपले पक्के विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. यात तुम्हाला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्तम गुणवत्ता देत पुरवले जातात. त्यामुळे संपूर्ण भारतात या कंपनीचे फॅन आहेत. ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या जिभेवर अधिराज्य गाजवत आहे. अशात अमुल कंपनीने मिळवलेल्या यशात अनेक होतकरू तरुणांना देखील सहभागी करून घेतले. यात त्यांनी आपल्या कंपनीची फ्रेंचायजी देत अनेकांना पैसे कमवण्यास संधी दिली. त्यामुळेच या कंपनीची लोकप्रियता आजही अबाधित आहे.
आपल्यापैकी अनेक तरुण मंडळी नोकरी पेक्षा स्वतःचा व्यवसाय चांगला या विचाराने उद्योजक होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत फार असते. पाहिले तर स्वतः चा व्यवसाय सुरू करायचा म्हणजे हातात भांडवल लागतं. भांडवल नसल्याने अनेक व्यक्ती हा मार्ग स्वीकारत नाहीत. तर आता जर तुम्हाला देखील व्यवसाय करायची इच्छा असेल तर तुम्ही अमुल कंपनीच्या सहाय्याने तो सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल. तसेच यात किती नफा मिळेल या सर्वच गोष्टींची माहिती आज जाणून घेऊ.
एवढी रक्कम गुंतवावी लागेल
अमुल कंपनीबरोबर काम करायचे असेल तर सर्वात आधी तुम्हाला एक 100 चौरस फूट जागा घेणे गरजेचे आहे. यात अमुल कंपनीच्या सर्व पदार्थांच्या मशीन बसवल्या जातील. या मशीन अमुल कंपनीच देते. त्यासाठी तुम्हाला 2 ते 5 लाख रुपये खर्च करावे लागतात. हे पैसे फक्त अमुलच्या फॉर्मेटनुसार आउटलेटवर आणि इतर उपकरणे बसनव्यात वापरले जातात. यातून तुम्ही अमुलाची फ्रँचायझी विकत घेता.
कमाई कशी होईल
अमुल फ्रँचायझीला तुम्हाला 25 हजार रुपये सुरक्षितता म्हणून जमा करावे लागतील. यात मार्जीन नुसार किरकोळ नफा होईल. अमुल मार्फत तुमच्या आउटलेटवर प्रॉडक्ट पाठवण्यात येते. मार्जिन उत्पादनानुसार किरकोळ बदलते आणि पूर्णतः ती बदलायची की नाही हे पार्लर मालकावर अवलंबून आहे. यातील दुधाच्या पिशवीवर 2.5 टक्के मार्जिन आहे. तर आईसक्रीमवर 20 टक्के आणि इतर दुग्धजन्य पदार्थांवर 10 टक्के. त्यामुळे तुमचे पार्लर सुरू झाल्यावर तुम्ही तुमच्या सोईने पदार्थ विकून बक्कळ नफा कमवू शकता.
असा साधा संपर्क
सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत तुम्ही दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
संपर्क क्रमांक – 022-68526666 तसेच [email protected] या मेलवर देखील अधिक माहिती विचारू शकता.
अमुल कंपनीची ही फ्रँचायझी तुम्हाला उत्तम मार्जिन देते. त्यात अधिक नफा कमवून तुम्ही आणखीन काही ठिकाणी याचा व्यवसाय सुरू करू शकता. कोणताही व्यवसाय करत असताना सुरुवात छोट्या पायरीपासूनच होते. त्यामुळे ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Business Idea of Amul Franchise to earn lakhs of rupees check details 15 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC