11 January 2025 2:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; आर्थिक चणचण जाणवत असेल तर घरच्या घरी तुफान चालणारे व्यवसाय सुरू करा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
x

Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; आर्थिक चणचण जाणवत असेल तर घरच्या घरी तुफान चालणारे व्यवसाय सुरू करा

Business Idea

Business Idea | बहुतांश गृहिणी घरीच बसलेल्या असतात. आपल्या नवऱ्याचा डबा, मुलांच्या शाळेची लगबग त्याचबरोबर घरातील लादी, कपडे, भांडी धुणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवण बनवणे या सर्वसामान्य कामांमध्ये त्या आपला वेळ घालवतात. या सर्व गडबडीमध्ये त्यांच्याजवळ काही फावला वेळ देखील उरलेला असतो. या वेळात गृहिणीने ठरवलं तर ती देखील साईड बाय साईड व्यवसाय सुरू करून उद्योजिका देखील बनू शकते.

आज या बातमीपत्रातून आम्ही तुम्हाला कमी वेळ त्याचबरोबर कमी भांडवलात सुरुवात करता येईल अशा काही घरगुती व्यवसायांबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया एकेक करून महिलांसाठी बक्कळ कमाई करून देणाऱ्या आणि तुफान चालणाऱ्या व्यवसायांविषयी.

पाळणाघर :

सध्याच्या काळात बहुतांश महिलांना घरी राहून संसार सांभाळण्यात काडीचा इंटरेस्ट नसतो. त्यांना घरात बाहेर पडून ऑफिसला जाऊन स्वतःचा बँक बॅलन्स तयार करणे आणि स्वावलंबी होणे गर्वाची गोष्ट वाटते. आता आई वर्किंग वुमन असल्याकारणाने ती आपल्या बाळाला घरामध्ये इतरही कोणी वडीलधारी व्यक्ती नसल्यामुळे तिच्या बाळाला थेट पाळणाघरात ठेवण्याचा विचार करते. त्यामुळे तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी पाळणाघर सुरू करण्याची कल्पना प्रभावित ठरू शकतो.

लघुउद्योग :

महिलांना हॅन्ड क्राफ्ट, त्याचबरोबर शोभेच्या छोट्या मोठ्या वस्तू तयार करणे, ज्वेलरी संबंधित गोष्टी हाताने तयार करणे एवढंच नाही तर, आरी वर्क, क्लोथिंग वर्क, नथ मेकिंग त्याचबरोबर खाद्यपदार्थांमध्ये नवनवीन स्नॅक्स पदार्थ बनवणे, बेकरी पदार्थ बनवणे, विविध प्रकारचे पॅटीस, पिझ्झा यांसारख्या अनेक गोष्टी करण्यास जास्त रस असतो. तुम्ही तुमचं उत्कृष्ट कामाचे रूपांतर एखाद्या व्यवसायात करू शकता. यामधून तुम्ही अक्षरशः महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

शेअर्स ट्रेडिंग :

गेल्या बराच दिवसांपासून तुम्ही सोशल मीडिया अकाउंटवर त्याचबरोबर फेसबुक, इंस्टाग्राम, यु-ट्युब वर शेअर्स किंवा ट्रेडिंगशी निगडित बऱ्याच व्हिडिओ पाहिल्या असतील. यामध्ये बरेच एजंट आमचे क्लासेस जॉईंट करा, अमिषा पद्धतीने लाखोंच्या घरात पैसे कमवत आहोत तसे तुम्ही देखील कमवू शकता अशा पद्धतीच्या जाहिराती करतात. तर, तुम्ही देखील शेअर्सचे ट्रेडिंग शिकून घेऊन एजंट म्हणून काम करू शकता. यामध्ये तुम्ही लाखोंची कमाई करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Business Idea Saturday 11 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Business Idea(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x