12 January 2025 9:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील
x

Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम

Business Idea

Business Idea | स्त्री ही एकच स्वतःच जीवनदानी आहे. त्यामुळे तिच्या अंगी कला जोपासण्याचे गुण पूर्णपणे असतात. बहुतांश महिलांचे स्वप्न असतं की, आपलं सुद्धा स्वतःचा एखादा रेस्टॉरंट किंवा एखादी खानावळ असावी. तसं पाहायला गेलं तर बऱ्याच महिला वेगवेगळी स्वप्न रंगवतात परंतु नवरा, मूलबाळ, सासू सासरे यांच्यामुळे त्यांना फावला असा वेळ अजिबात मिळत नाही. आज आम्ही महिलांसाठी घरच्या घरी सुरू करून लाखो रुपयांची कमाई करून देणाऱ्या लघुउद्योगांबद्दल सांगणार आहोत.

Youtube चॅनेल :

ज्या महिलांना घराबाहेर पडून नोकरी करायची नसेल आणि व्यवसाय करण्याची तितकीशी क्षमता नसेल तर, अशा महिलांना यूट्यूब चॅनेल सुरू करून आणि स्वतःची कला सादर करून देखील भरपूर पैसे कमवता येऊ शकतात. तुम्ही यावर शिवणकाम, पाककला, ब्युटी मेकअप त्याचबरोबर मेहंदी क्लासेस, योगा क्लासेस, बेकरी प्रॉडक्ट मेकिंग यांसारख्या विविध प्रकारच्या व्हिडिओज म्हणून Youtube चॅनेल माध्यमातून पैसे कमवू शकता.

फराळ लघुउद्योग :

दिवाळी तसेच गणेशोत्सव यांसारख्या सणासुदीच्या दिवसांमध्ये बहुतांश व्यक्ती घरगुती पद्धतीने तयार होणाऱ्या फराळांच्या शोधात असतात. आज-काल बाजारातील तेलकट आणि अधिक तूपट पदार्थ खाऊन लोकांच्या तब्येती बिघडतात. अशावेळी तुम्ही घरगुती फराळ लघुउद्योग व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही चकली, चिवडा, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, फरसाण त्याचबरोबर सणासुदींच्या दिवसांमधील वेगवेगळ्या प्रकारचे फराळ बनवून विकू शकता. कालांतराने तुम्ही स्वतःचा स्टॉल देखील लावू शकता.

कपड्यांचे काम :

कपड्यांच्या कामांमध्ये महिला शातीर असतात. सध्या ब्रायडल सीजन सुरु झाला आहे. बऱ्याच महिलांना वेगवेगळ्या डिजाईनचे आणि खास करून हाताने विणलेल्या नवनवीन डिझाईनचे ब्लाऊज त्याचबरोबर रुमाल, पिशवी, कुर्ता, टॉप, साईड बॅग या सर्व गोष्टींची प्रचंड आवड असते. आजकाल प्रत्येक व्यक्ती युनिक गोष्टींच्या शोधात असते. त्यामुळे तुम्ही तुमची कला कपड्यांच्या कामांमध्ये ओतून त्यातून काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करून लाखो रुपयांची कमाई करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही तुमचे प्रॉडक्ट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील विकू शकता. सध्या मंत्रा, मीशो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर लाखोंच्या संख्येने ग्राहक वस्तू खरेदी करतात. त्यामुळे तुम्हाला याचा दोन्ही बाजूंनी फायदा होऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Business Idea Thursday 12 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Business Idea(86)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x