16 April 2025 10:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Business Idea | पैसे साठवून ठेवण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करा; दररोज होईल 7 ते 14 हजारांचा गल्ला

Business Idea

Business Idea | बहुतांश व्यक्तींना स्वतःचा बिजनेस सुरू करावासा वाटतो. आपल्या बिजनेसमध्ये चांगली मिळकत व्हावी आणि आपला बिझनेस तुफान चालवा असं प्रत्येकाला वाटतं. परंतु तुम्ही जो व्यवसाय निवडत आहात त्या मागचा अभ्यास आणि बाजारातील त्याची मागणी माहित असणे अत्यंत गरजेचे आहे.

बऱ्याचदा होतं असं की, आपण जास्तीत जास्त भांडवल जोडून मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू करतो परंतु आपल्याला अपेक्षेपेक्षा फार कमी मिळकत मिळते. अशावेळी व्यवसाय करणारा व्यक्ती हताश होतो, निराश होतो आणि व्यवसाय करण्याचा स्वप्न गमावून बसतो. परंतु तुम्हाला पैसे कोणत्या व्यवसायात गुंतवायचे आणि व्यवसाय करण्याची योग्य पद्धत ठाऊक असेल तर, तुम्ही अगदी दिवसाला 7 ते 14 हजार रुपयांचा गल्ला कमवू शकता.

मिनी डिपार्टमेंटल स्टोअर :

1. तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की, मिनी डिपार्टमेंटल स्टोअरमधून आपण किती पैसे कमवू शकतो. त्याचबरोबर हा व्यवसाय करणे फायद्याचा ठरेल की नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत.

2. अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागांपर्यंत किराणा सामानाची गरज प्रत्येक घराघरांमध्ये भासते. अगदी प्रत्येक महिन्याला किराणा स्टोअरमधून महिन्याचे राशन पोहोचत असते. परंतु मोठमोठे किराणा स्टोअर हाकेच्या अंतरावर उपलब्ध नसतात.

3. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या एरियामध्ये जवळपास एखादा मध्यम आकाराचा गाळा पाहून मिनी डिपार्टमेंटल स्टोअर उघडू शकता. यामध्ये अगदी गोळ्या बिस्किटांपासून ते किराणा सामानापर्यंत. त्याचबरोबर इतरही गरजेच्या वस्तू किंवा अन्नपदार्थ तुम्ही तुमच्या छोट्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये ठेवू शकता.

4. दूध, अंडी, केळी त्याचबरोबर दररोजचा भाजीपाला, ज्यामध्ये टोमॅटो, कांदे, लसुन, बटाटा, मिरची, कोथंबीर या सर्व गोष्टींचा समावेश असू शकतो. कारण की हे सर्व अन्नपदार्थ आपण दररोज आपल्या आहारात घेत असतो. त्यामुळे तुम्ही एक मिनी डिपार्टमेंटल स्टोअर उघडलं तर, दररोज तुम्हाला 14 हजार रुपयांचा गल्ला जमा होण्यास कोणीही रोखू शकत नाही.

मिनी डिपार्टमेंटल स्टोअरसाठी किती खर्च येईल :

1. तुम्हाला तुमच्या मिनी डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये किराणा सामानापासून ते दररोजच्या भाजीपाल्यापर्यंत सर्वच गोष्टी ठेवायच्या असतील तर, तुम्हाला वेगवेगळे डिपार्टमेंट किंवा वेगवेगळे कप्पे तयार करून घ्यावे लागतील.

2. त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमधील इंटिरियरवर देखील पैसे खर्च करावे लागतील. एवढंच नाही तर, गोळ्या बिस्किटांसाठीचे प्लास्टिकचे डबे, त्याचबरोबर कुरकुरे किंवा वेफर्स आणि इतरही स्नॅक्स पुडे लटकवण्यासाठी दहा ते बारा दोर. त्याचबरोबर हँगल्स यासारख्या विविध वस्तूंची गरज भासणार आहे.

3. तुम्हाला तुमच्या मिनी डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये चीज, पनीर किंवा इतरही दुग्धजन्य पदार्थ स्टोअर करून ठेवायचे असतील तर, तुम्हाला एक मिनी फ्रिज देखील घ्यावा लागेल. यामध्ये तुम्ही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ त्याचबरोबर आईस्क्रीम आणि छोट्या स्पेस फ्री किंवा मिनी केक देखील ठेवू शकता.

4. शॉपचे इंटेरियर आणि सुरक्षेबद्दल आणखीन बोलायचे झाले तर, तुम्हाला एकूण चार प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरा देखील घ्यावे लागतील. एक कॅमेरा तुमच्या गल्ल्याजवळ बसवलेला असला पाहिजे. त्यानंतर तुमच्या तीन वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये एक एक कॅमेरा बसवावा लागेल आणि एक कॅमेरा तुम्हाला तुमच्या स्टोअर बाहेरील रोडवर बसवून घ्यावा लागेल.

आतापर्यंत सांगितलेल्या सर्व गोष्टींसाठी म्हणजे तुम्ही डिपार्टमेंटल स्टोर उघडायचं असेल तर तुम्हाला किमान 20 किंवा 40 लाख रुपयांपर्यंत खर्च नक्कीच करावा लागेल. अगदी कमी पैशांत स्टार्टअप सुरू करून तुम्ही प्रत्येक महिन्याला भडगंज पैसे कमवू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Business Idea Wednesday 01 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Business Idea(92)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या