15 January 2025 4:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Earn Money Online | ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसोबत सुरु करा व्यवसाय, ऑनलाइन वस्तू विकून लाखो कमवा - Marathi News

Highlights:

  • Earn Money Online
  • तुम्ही सुद्धा कमवू शकता बक्कळ पैसे :
  • ऑनलाइन प्रॉडक्ट विकून कमवा पैसे :
  • अशाप्रकारे करा नोंदणी :
Earn Money Online

Earn Money Online | तुमच्यापैकी अनेकजण ऑनलाइन शॉपिंग करतच असतील. कोणी ॲमेझॉनवर तर कोणी मंत्रा, मीशो आणि फ्लिपकार्ट या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर आपण कायम काही ना काही खरेदी करत असतो. आपण या ऑनलाइन ॲपद्वारे वस्तू खरेदी तर करतो परंतु या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून पैसे कसे कमवता येतील याचा विचारच करत नाही.

आजकाल लोकांना घराबाहेर निघून आणि शॉपमध्ये जाऊन वस्तू खरेदी करायला कंटाळा येतो आणि म्हणूनच बरेचजण ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शॉपिंग करण्याचा पर्याय निवडतात. खरंतर बऱ्याच व्यक्ती ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या शॉपिंग ॲपवरून लाखो रुपयांची कमाई देखील करत आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची विक्री करू शकता त्याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. चला तर पाहूया.

तुम्ही सुद्धा कमवू शकता बक्कळ पैसे :
नुकतेच फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन ॲपवर फेस्टिवल सिझनसाठी ‘बिग बिलियन डेज’ आणि ‘ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल’ सुरू झाले आहे. या सेलमार्फत बऱ्याच कंपन्या जबरदस्त पैसे कमवत आहेत. तुम्ही सुद्धा ऑनलाइन पद्धतीने स्वतःचे प्रॉडक्ट विक्री करून भडगंज पैसे कमवू शकता.

ऑनलाइन प्रॉडक्ट विकून कमवा पैसे :
तुम्हाला घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून स्वतःची विक्री वाढवायची असेल तर, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट हे दोन एप्लीकेशन तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरू शकतात. यासाठी तुम्हाला एप्लीकेशन वरून विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागेल.

अशाप्रकारे करा नोंदणी :

1. सर्वप्रथम sell.amazon.in या वेबसाईटवर जा.

2. त्यानंतर उजव्या कोपऱ्यातील स्टार्ट सेलिंग हा पर्याय निवडून त्यावर क्लिक करा.

3. पुढे तुम्हाला ॲमेझॉन ॲपवर स्वतःचे लॉगिन करून घ्यावे लागेल. लॉगिन केले नसेल तर तुम्ही नवीन खाते देखील उघडू शकता.

4. पुढे तुम्हाला तुमचा जीएसटी क्रमांक नोंदवावा लागेल.

5. समजा तुम्ही जीएसटी लागू नसलेल्या कोणत्याही प्रॉडक्टची विक्री करत असाल तर, तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा पॅन क्रमांक टाकणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला पॅन क्रमांकचा फोटो काढून अपलोड करावा लागेल.

6. पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमच्या स्टोअरसाठी एका नावाची निवड करावी लागेल. त्याचबरोबर तुम्हाला तुम्ही करत असलेल्या उत्पादनाच्या शिपिंगची माहिती देखील द्यावी लागेल.

7. तुम्हाला तुमच्या उत्पादनाचा आकार, डिलेवरीचा वेग आणि पिकपचा पत्ता देखील नमूद करावा लागेल. त्यानंतर संपूर्ण बँक डिटेल्स टाकून तुम्ही ही प्रोसेस पूर्ण करू शकता. आता तुम्ही अगदी सहजरित्या तुमचे प्रॉडक्ट ॲमेझॉनवर विकू शकता आणि घरबसल्या पैसे कमवू शकता.

Latest Marathi News | Earn Money Online 27 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Earn Money Online(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x