18 April 2025 7:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Udyogini Scheme | महिलांनो, स्वतःचा उद्योग सुरु करा, सरकारची 'उद्योगिनी' मिळवून देते 3 लाख रुपयांचे कर्ज, गृह उद्योग सुरु करा

Udyogini Scheme

Udyogini Scheme | केंद्र सरकार महिलांसाठी विविध योजना राबवतात. कोणतीही महिला बेरोजगार किंवा हतबल राहावी नाही यासाठी सरकारकडून महिलांकरिता हजारो योजना सुरू आहे. यामधीलच एक म्हणजे उद्योगिनी.

कोणतीही महिला केंद्राच्या उद्योगिनी योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांचे कर्ज मिळवू शकते आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते. या योजनेअंतर्गत एकूण 88 उद्योग प्रकल्पांचा समावेश आहे. ज्या महिलांना लघु उद्योगांमध्ये स्वतःचे नाविन्य कमवायचे आहे त्यांच्यासाठी उद्योगिनी अत्यंत फायद्याचे ठरू शकते. योजनेबद्दलच्या नियम आणि अटी नेमक्या काय आहेत यावर नजर टाकूया.

उद्योगिनी योजना नेमकी कशी चालते :

उद्योगिनी योजना ही केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचा एक भागच आहे. ज्यामध्ये महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत केली जाते. यामध्ये एका सर्वसामान्य महिलेला स्वतःच्या पायावर एक उद्योजिका म्हणून उभे राहण्यास मदत करते. केंद्राच्या महिला व बालविकास कल्याणकडून योजना राबविण्यात येते.

योजनेच्या कर्ज मर्यादेविषयी जाणून घ्या :

योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलेला 3 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. परंतु ज्या महिलेला उद्योगासाठी कर्ज हव आहे तिच्या घरातील वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांच्या आत असणे गरजेचे आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे विधवा तसेच दिव्यांग महिलांसाठी कोणत्याही प्रकारची लिमिट दिली गेली नाहीये. त्यांना थेट व्याज मुक्त कर्ज दिलं जातं. इतर महिलांसाठी 10 ते 12% व्याजाने कर्ज दिले जाते.

महत्त्वाचं :

1. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलेचे वय 18 ते 55 वयोगटामध्ये असणे गरजेचे आहे.

2. उद्योगिनी अंतर्गत जी महिला कर्ज घेणार असेल तिने स्वतःचा सिबिल स्कोर सर्वप्रथम तपासून घ्यावा. मजबूत सिबिल स्कोर असलेल्या महिलांनाच उद्योगिनी कर्ज देऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही आधीच्या कर्जाचे पेमेंट केले नसेल तर तुम्हाला उद्योगिनी अंतर्गत कर्ज मिळणे मुश्कील आहे.

3. कर्जासाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी अर्जाबरोबर काही महत्त्वाची कागदपत्रे देखील सबमिट करायची आहेत. ज्यामध्ये पासपोर्ट साईजचे दोन फोटो, जन्माचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक खाते पासबुक या सर्व कागदपत्रांसह अर्ज स्वीकारला जाईल.

4. तुम्हाला या योजनेअंतर्गत आणखीन माहिती हवी असेल तर तुम्ही थेट बँकेची संपर्क साधू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Udyogini Scheme Monday 16 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Udyogini Scheme(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या