18 November 2024 12:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

IRCTC Login | रेल्वे प्रवाशांनो, कन्फर्म तात्काळ तिकीट बुकिंगची चिंता नको, या टिप्समुळे सहज मिळेल कन्फर्म तिकीट - Marathi News

IRCTC Login

IRCTC Login | रेल्वे ही प्रवाशांसाठी जीवनदानी आहे. मैलो न मैल प्रवास करण्यासाठी आपल्याला रेल्वे सोयीची पडते. बाय रोड जाण्यापेक्षा बरेचजण कमी पैशांमध्ये रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. अशातच तुम्ही रेल्वेच्या तात्काळ तिकिटाविषयी आत्तापर्यंत अनेक वेळा ऐकलंच असेल. आज आम्ही तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने त्याचबरोबर जलद गतीने तात्काळ तिकीट कसं कन्फर्म करायचं हे सांगणार आहोत.

इतर सीटपेक्षा तात्काळ सीट मिळणे थोडे कठीण असते. कारण की अचानक कोणत्याही व्यक्तीचे प्लॅनिंग ठरू शकते किंवा अचानक एखाद्याला इमर्जन्सी येऊ शकते. त्यामुळे तात्काळ तिकिटासाठी सीट मिळणे थोडे अवघड होऊन बसते. त्याचबरोबर दिवाळीमध्ये देखील हजारोंच्या संख्येने प्रवासी तात्काळ तिकिटासाठी मागणी करतात अशावेळी तुम्हाला इतरांपेक्षा सर्वातआधी तिकीट बुक करायचं असेल तर, तुम्ही तात्काळ तिकीट बुकिंग हे फीचर वापरू शकता. आम्ही सांगितलेल्या पुढील ट्रिक वापरून तुम्हाला चटकन तिकीट मिळवता येईल.

1) तारीख कन्फर्म करा :
बऱ्याचदा अनेक व्यक्ती सुट्टीच्या दिवशी म्हणजेचं वीकेंडच्या दिवशी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन तयार करतात. त्याचबरोबर काही व्यक्ती वीकेंडच्या दिवशी देखील तिकीट बुक करण्याचा विचार करतात. परंतु असं न करता तुम्ही विकोडेजला तिकीट बुक करून स्वतःची तात्काळ कन्फर्म सीट मिळवू शकता. तात्काळ तिकीट तुम्हाला एक दिवस आधी बुक केली तरी सुद्धा मिळेल.

2) डिटेल्स रेडी ठेवा :
तुम्हाला तात्काळ तिकीट ऑनलाईन पद्धतीने बुक करायचे आहे. त्यामुळे पटकन तिकीट बुक होण्यासाठी तुम्ही माहिती शोधण्यापेक्षा आधीच सर्व डिटेल्स रेडी ठेवा. जेणेकरून तुम्हाला पटापट इन्फॉर्मेशन फील करता येईल.

3) तिकीट बुकिंगकरिता तुम्ही एकापेक्षा अधिक डिवाइसचा वापर करा :
तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही एकापेक्षा जास्त डिवाइसचा वापर करणे गरजेचे आहे. एकाचवेळी अनेक ब्राउझर्स ओपन करून कंटिन्यू तिकीट बुक करण्याकडे लक्ष द्या. जेणेकरून एखाद्या तरी ब्राउझर वरून तुमचं तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता असेल.

4) पेमेंट ऑप्शनकडे नीट लक्ष द्या :
तात्काळ तिकीट बुक करताना तुम्ही लवकरात लवकर तिकीट कशा पद्धतीने बुक होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी तुम्ही यूपीआय मेथड, मोबाईल वॉलेट, नेट बँकिंग यांसारख्या सुविधा वापरू शकता. या ऑप्शनमुळे तुम्हाला चटकन तिकीट बुक करण्यास मदत मिळेल. सोबतच तुम्ही आयआरसीटीसी वॉलेटचा देखील वापर करू शकता.

5) सुनिश्चित वेळेवर लॉगिन करा :
ऐसी कोचसाठी तात्काळ तिकिटाची वेळ सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होते त्यामुळे तुम्ही 10 वाजायच्या आधीच 9:55 लाच लॉगिन करून घ्या. जेणेकरून तुम्हाला चटकन सीट मिळण्यास मदत होईल. अशातच तुम्हाला स्लीपर क्लाससाठी ट्रेनचं तात्काळ तिकीट बुक करायचं असेल तर, सकाळी 11 वाजायच्या आधीच लॉगिन करून घ्या. तुम्ही लॉगिन वेळेच्या दोन ते तीन मिनिट आधीच लॉगिन केलं तर, तुम्हाला सर्वप्रथम सिटी मिळण्याची शक्यता असेल.

6) तेज इंटरनेट :
तुम्ही हाय स्पीड इंटरनेट असलेल्या ठिकाणी लॉगिन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण की लॉगिन करण्याची प्रोसेस केवळ काही मिनिटांचीच असते. त्यामुळे तुम्हाला फास्ट स्पीड असलेल्या नेटवर्कमध्ये बसूनच तात्काळ तिकिटाचं बुकिंग करायचं आहे.

Latest Marathi News | IRCTC Login 18 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#IRCTC Login(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x