5 February 2025 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER Post Office Schemes | फक्त व्याजाचे 2,54,272 रुपये आणि मॅच्युरिटीला 8,54,272 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, महिना 3000 रुपयांच्या SBI SIP वर मिळेल 1.39 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा
x

IRCTC Railway Ticket Booking | होय! ऑनलाइन रेल्वे किट बुकिंग सिस्टिममध्ये बदल, नवे बदल लक्षात ठेवा

IRCTC Railway Ticket Booking

IRCTC Railway Ticket Booking | हल्ली रेल्वेतून प्रवास करणारे बहुतांश प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन बुक करतात. पण शेवटच्या वेळी तुम्ही ट्रेनचं तिकीट ऑनलाईन बुक केलं होतं ते आठवतंय का? आठवत नसेल तर ही बातमी नीट वाचा. 2022 मध्ये जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, आयआरसीटीसीचे 3 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. अशा परिस्थितीत आयआरसीटीसीने केलेल्या बदलांची माहिती सर्वांना असणं गरजेचं आहे.

अकाउंट व्हेरिफाय करणे आवश्यक
कोविडनंतर रेल्वे गाड्यांच्या संचलनानंतर आयआरसीटीसीने अॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करण्याच्या नियमात बदल केला होता. नव्या नियमानुसार युजर्सना तिकीट बुक करण्यापूर्वी त्यांचे अकाउंट व्हेरिफाय करणे आवश्यक होते. परंतु, सुमारे ४० लाख युजर्सनी अद्याप आपले अकाउंट व्हेरिफाय केलेले नाही. जे युजर्स अकाउंट व्हेरिफाय करणार नाहीत, त्यांना भविष्यात ऑनलाइन किट बुक करता येणार नाही.

पडताळणीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा
आयआरसीटीसी’ने जारी केलेल्या नियमांनुसार, युजर्सने ऑनलाइन किट बुक करण्यापूर्वी मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडीची पडताळणी करणं आवश्यक आहे. कोविड-१९ साथ सुरू झाल्यानंतर अनेक महिने वेबसाइट किंवा अॅपच्या माध्यमातून किट बुक न केलेल्या प्रवाशांना आयआरसीटीसीने केलेले बदल लागू होणार आहेत. जर तुम्ही अद्याप तुमच्या खात्याची पडताळणी केली नसेल, तर लवकरात लवकर पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा. ते करून घेतल्यानंतर किट बुक करण्यात अडचण येणार नाही. जाणून घेऊयात पडताळणी करून घेण्याची प्रक्रिया..

मोबाइल आणि ई-मेलची पडताळणी
१. आयआरसीटीसी अॅप किंवा वेबसाइटवर जाऊन व्हेरिफिकेशन विंडोवर क्लिक करा.
२. आता तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी टाका.
३. दोन्ही माहिती टाकल्यानंतर व्हेरिफाय बटणावर क्लिक करा.
४. येथे क्लिक केल्यावर तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल, तो प्रविष्ट करा आणि मोबाइल नंबर व्हेरिफाय करा.
५. ई-मेल आयडीवर कोड टाकल्यानंतर तुमचा मेल आयडीही व्हेरिफाय होईल.
६. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही ट्रेनसाठी ऑनलाइन किट बुक करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IRCTC Railway Ticket Booking updates check details on 12 December 2022.

हॅशटॅग्स

#IRCTC Railway Ticket Booking(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x