21 December 2024 10:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

IRCTC Train Confirm Ticket | या टिप्स फॉलो करा आणि फक्त एका मिनिटात मिळवा रेल्वेचे कन्फर्म तिकीट

Train Confirm Ticket

Train Confirm Ticket | लांबचा प्रवास करत असताना प्रत्येक सामान्य आणि गरिब माणूस रेल्वे प्रवासाचा पर्याय निवडतो. यात जर तुमह्ला कन्फॉर्म तिकीट मिळाले तर प्रवास करणे आणखीन सोईचे होते. अनेक व्यक्तींना रेल्वे प्रवासात देखील ४ ते ५ दिवस लागतात. अशा वेळी कनफॉर्म तिकीट नसेल तर प्रवास करणे खूप कठीण होते. त्यामुळे प्रवासी तासंतास रांगेत उभे राहून कनफॉर्म तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतात.

इतर दिवसांमध्ये कनफॉर्म तिकीट मिळवण्यास तितक्याश्या अडचणी येत नाहीत. मात्र सणासुदीच्या दिवसांमध्ये या समस्या खुप जास्त असतात. त्यामुळे अनेक जण ऑनलाइन तिकीट भरण्याचा प्रयत्न करतात. मात्र इथे देखील माहिती भरण्यातच जास्त वेळ जातो. त्यामुळे आरक्षित तिकीटांची जागा भरून जाते. अशात आज या बातमितून वेळेवर आणि लगेचच कनफॉर्म तिकीट नेमके कसे मिळवायचे याच्या काही टिप्स सांगणार आहोत.

तात्काळ कनफॉर्म तिकीट हवे असल्यास IRCTC वर तिकीट बूक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यात कनफॉर्म तिकीट बूक करताना तुमच्याकडे जास्त चांगले कनेक्शन असलेले नेटवर्क असायला हवे. तसेच पेमेंटमध्ये कोणतीही अडचण न यावी यासाठी तुम्हाला नेटवर्क बरोबरच युपीआय ऍपचाही वापर करावा लागेल.

IRCTC मध्ये मास्टर लिस्ट म्हणून एक पर्याय आहे. यात तुम्हाला कनफॉर्म तिकीट मिळण्यात जास्त मदत होते. ऑनलाईन तिकीट बूक करत असाल तर हा पर्याय जरूर निवडावा. याने लगेचच तिकीट मिळवण्यास मदत होते.

मास्टर लिस्ट एका फिचर प्रमाणे काम करते. यात तुम्हाला तुमचा सर्व तपशील आधीच भरावा लागतो. तसेच वेळोवेळी तो अपडेट ठेवावा लागतो. IRCTC चे ऍप किंवा वेबसाईटवर तुम्हाला हे फिचर दिसेल. त्यामुळे प्रवासाचे प्लॅनींग करत असाल तर आधी मास्टर लिस्ट अपडेट करा.

अनेकदा तिकीट बूक करताना सर्व तपशील टाकण्यात खुप वेळ वाया जातो. त्यामुळे तिकीटाचे पैंसे भरेपर्यंत सीट फूल झालेल्या असतात. अशावेळी मास्टर लिस्ट हा पर्याय खूप कामी पडतो. यात आधिच तुमची माहिती भरलेली असते. त्यामुळे तिकीट बूक करताना ती माहिती तुम्हाला पुन्हा भरावी लागत नाही. या काही छोट्या मात्र खूप फायद्याच्या टिप्स आहेत. यात तुम्हाला तिकीट घराबाहेर तासंतास रांगेत ऊभे राहण्याची देखील गरज नसते. तसेच ऑनलाइन तिकीट बूक करताना कोणतीही घाई गडबड न करता तिकीट मिळवता येते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : IRCTC Train Confirm Ticket Follow these important tips for conform ticket 30 October 2022.

हॅशटॅग्स

Train Confirm Ticket(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x