20 April 2025 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

IRCTC Train Ticket Refund | अनेकांना माहीतच नाही, आयत्यावेळी रद्द केलेल्या कन्फर्म रेल्वे तिकिटचा रिफंड मिळतो, स्टेप्स पहा

IRCTC Train Ticket Refund

IRCTC Train Ticket Refund | भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हटले जाते. त्यात दररोज लाखो लोक प्रवास करतात. रेल्वेशी संबंधित अनेक नियमांची माहिती अजूनही बहुतांश प्रवाशांना नाही. ट्रेन रद्द झाल्यास प्रवाशांना रिफंड मिळू शकतो, याची माहिती जवळपास सर्वांनाच आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमची ट्रेन चुकली तरी तुम्ही परताव्याचा दावा करू शकता? होय, गाडी चुकली तरी प्रवासी तिकिटाचे पैसे काढू शकतात. (How to file TDR for Cancel Train Ticket)

जर मी ट्रेन चुकलो तर मला परतावा मिळू शकेल का? लोक याबद्दल इंटरनेटवर शोध घेतात :
म्हणजे जर मी ट्रेन चुकलो तर मला रिफंड मिळू शकेल का? हे अनेक जणांसोबत घडत असल्याने हा प्रश्न इंटरनेटवर घोंघावत राहतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देत आहोत.

तुम्ही प्रवास करणार असलेली ट्रेन पकडू शकत नसाल आणि तुम्हाला प्रवास करता येत नसेल तर तुम्ही या प्रकरणात तिकिटाचे पैसे काढू शकता. तिकीट परताव्यासाठी दावा करावा लागेल. रिफंड मिळवण्यासाठी काही अटींचं पालन करावं लागतं.

टीडीआर भरलाच पाहिजे
गाडी चुकल्यास टीडीआर (Ticket Deposit Receipt-TDR) भरावा. ट्रेन सुटल्यानंतर तासाभरात चार्टिंग स्टेशनवरून टीडीआर दाखल करू शकता. प्रवासी ऑनलाइन आणि ऑफलाइन टीडीआर दाखल करू शकतात. परताव्यासाठी रेल्वेकडून टीडीआर दिला जातो. परताव्याच्या प्रक्रियेस सुमारे 60 दिवस लागू शकतात.

ऑनलाइन टीडीआर कसा भरावा – How to file TDR for Cancel Train Ticket
* आपल्या आयआरसीटीसी खात्यात लॉग इन करा.
* बुक तिकीट हिस्ट्रीवर क्लिक करा.
* ज्या पीएनआरसाठी टीडीआर भरायचा आहे, तो पीएनआर निवडा आणि त्यानंतर फाइल टीडीआरवर क्लिक करा.
* टीडीआर परतावा मिळवण्यासाठी तिकिटाच्या तपशीलातून प्रवाशाचे नाव निवडा.
* टीडीआर दाखल करण्याच्या कारण यादीमधून निवडा किंवा दुसरे कारण टाइप करण्यासाठी “इतर” वर क्लिक करा.
* आता सबमिट बटणावर क्लिक करा.
* जर तुम्ही “OTHER” हा पर्याय निवडला असेल तर टेक्स्ट बॉक्स उघडेल.
* परताव्याचे कारण लिहा आणि ते सबमिट करा.
* टीडीआर दाखल करताना कन्फर्मेशन दिसेल.
* जेव्हा सर्व तपशील बरोबर असतील, तेव्हा ओके वर क्लिक करा.
* टीडीआर एंट्री कन्फर्मेशन पेजवर पीएनआर क्रमांक, ट्रान्झॅक्शन आयडी, संदर्भ क्रमांक, टीडीआर स्टेटस आणि कारणे दिसतील.

I-ticket असेल तर टीडीआर ऑनलाइन भरता येणार नाही
आय-तिकिटाचे बुकिंग ऑनलाइन करता येईल, पण हे तिकीट कागदाच्या (हार्डकॉपी) स्वरूपात उपलब्ध आहे. आय-तिकीट कुरिअर किंवा पोस्टद्वारे उपलब्ध आहे. त्याचा परतावा ऑनलाइन घेता येणार नाही. स्टेशन मास्तरांकडे आय-तिकीट जमा करून प्रवाशाला टीडीआर घ्यावा लागणार आहे. मग ती पूर्ण भरून जीजीएम (आयटी), इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, इंटरनेट तिकीट केंद्र, आयआरसीए बिल्डिंग, स्टेट एन्ट्री रोड, नवी दिल्ली 110055 या पत्त्यावर पाठवावी लागते.

News Title: IRCTC Train Ticket Refund process check details on 16 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IRCTC Train Ticket Refund(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या