22 November 2024 12:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Railway Confirm Ticket | रेल्वे चार्ट तयार झाल्यानंतरही चालत्या ट्रेनमध्ये मिळेल कन्फर्म तिकीट, हा पर्याय लक्षात ठेवा

Railway Confirm Ticket

Railway Confirm Ticket | भारतीय रेल्वे हे देशातील वाहतुकीचे सर्वात मोठे साधन आहे. रेल्वेकडून वेळोवेळी मोठ्या सणासुदीला आणि प्रसंगी विशेष गाड्या चालवल्या जातात. पण तरीही मागणी जास्त आणि गाड्यांमध्ये सीटची उपलब्धता कमी असल्याने लोकांना ट्रेनमध्ये तिकीट मिळत नाही. रेल्वे प्रवाशांना अनेकदा प्रतीक्षा करून, जनरल तिकीट घेऊन प्रवास करावा लागतो. अनेकदा असे होते की, तात्काळ तिकीट बुक करूनही कन्फर्म तिकीट मिळत नाही.

आज आम्ही तुम्हाला एक अनोखा मार्ग सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही कन्फर्म तिकीट मिळवू शकता. आयआरसीटीसीच्या या फीचरच्या माध्यमातून चार्ट तयार झाल्यानंतरही तुम्हाला कन्फर्म तिकीट सहज मिळू शकते.

ट्रेनमध्ये सीट रिकामी असेल तर तिकीट कसे बुक करू शकता
आज आम्ही तुम्हाला तो मार्ग सांगत आहोत ज्याद्वारे ट्रेनचार्ट तयार झाल्यानंतर ट्रेनमध्ये सीट रिकामी राहिली तर तुम्ही तिकीट कसे बुक करू शकता. अनेकदा असं होतं की एखादा प्रवासी शेवटच्या क्षणी ट्रेन रद्द करतो, मग आयआरसीटीसीच्या या फीचरच्या मदतीने तुम्ही कन्फर्म तिकीट मिळवू शकता.

चार्ट / व्हॅकेन्सी फिचर
आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवर तुम्हाला चार्ट/व्हॅकेन्सी नावाचे फीचर दिसेल. या फीचरच्या माध्यमातून चार्ट तयार झाल्यानंतरही चालत्या ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळू शकतं. या फिचरच्या माध्यमातून प्रवाशांना ट्रेनच्या स्लीपर किंवा एसी क्लासमध्ये किती जागा रिकाम्या आहेत याची माहिती मिळू शकते. तुम्हाला हवं असेल तर रिक्त जागांची माहिती टीटीईला दाखवू शकता आणि त्यांच्याकडून तिकिटंही मिळवू शकता.

भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार, अनेकदा असं होतं की, शेवटच्या क्षणी एखाद्या प्रवाशाकडून ट्रेनची कन्फर्म सीट रद्द केली जाते आणि मग त्याचं अलॉटमेंट दुसऱ्या कुणाच्या नावावर केलं जात नाही. आणि त्यावेळी चार्ट तयार झाल्यानंतर ट्रेनच्या कोणत्या डब्यात कोणती सीट रिकामी आहे, हे तुम्ही या फीचरच्या माध्यमातून ऑनलाइन पाहू शकता.

एखादी जागा रिकामी दिसली तर ती सीट तुम्ही सहज बुक करून सीट मिळवू शकता. विशेष म्हणजे जर तुम्ही इमर्जन्सीमध्ये कुठेही जात असाल तर ट्रेनमध्ये चढताना रिअल-टाइम स्टेटस चेक करत राहू शकता आणि जिथे सीट रिकामी आहे तिथे तिकीट बुक करू शकता.

पहिला चार्ट ट्रेन सुटण्याच्या 4 तास आधी पाहता येतो तर दुसरा चार्ट ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटे आधी पाहता येतो.

Charts/Vacancy फिचरचा लाभ कसा घ्यावा?
* IRCTC च्या वेबसाइटवर लॉग इन करा
* यानंतर वरच्या उजवीकडे दिसणाऱ्या Charts/Vacancy पर्यायावर क्लिक करा.
* Train आयकॉनवर क्लिक केल्यानंतर हा पर्याय IRCTC ॲपमध्ये दिसेल
* त्यानंतर आपला प्रवास तपशील जसे की ट्रेन नंबर, प्रवासाची तारीख आणि बोर्डिंग स्टेशन प्रविष्ट करा
* माहिती भरल्यानंतर ‘Get Train Chart’ या पर्यायावर टॅप करा.
* यानंतर तुम्हाला स्क्रीनवर रिझर्वेशन चार्ट दिसेल
* त्यानंतर प्रत्येक क्लास कोच आणि कोचमध्ये किती जागा रिकाम्या आहेत हे तुम्ही पाहू शकता.
* लेआऊट पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या कोच नंबरवर क्लिक करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Railway Confirm Ticket after chart preparation IRCTC check details 23 June 2024.

हॅशटॅग्स

#Railway Confirm Ticket(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x