21 November 2024 7:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News
x

Railway Ticket Booking | रेल्वेचे तिकीट बुक करण्याआधी एक काम करा, स्लीपर कोचच्या पैशात AC मधून प्रवास कराल

Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आत्तापर्यंत रेल्वेतून प्रवास नक्कीच केला असेल. तुम्हाला रेल्वेतून प्रवास करताना कधी असा अनुभव आला आहे का की, तुम्ही तिकीट बुक केलंय स्लीपर क्लासचं परंतु तुम्हाला सीट मिळाली AC क्लासची.

अशी गोष्ट झाल्यानंतर तुम्हाला हाच हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, रेल्वेने आपल्याला कमी पैशांमध्ये AC क्लासची बर्थ का बरं बुक करून दिली असेल. तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल तर, ही बातमी खास तुमच्यासाठी. रेल्वेने खास प्रवाशांकरिता ऑटो अपग्रेड स्कीम सुरू केली आहे. ही स्कीम सर्वसामान्यांना प्रचंड फायदा मिळवून देऊ शकते. नेमकं काय आहे या योजनेचे उद्दिष्ट जाणून घेऊ.

काय आहे ऑटो अपग्रेड स्कीम :
रेल्वेमध्ये स्लीपर कोच, अप्पर बर्थ, लोअर बर्थ AC 1, AC 2 आणि AC 3 यांसारखे वेगवेगळे क्लास असतात. बऱ्याचदा एसी टू आणि एसी थ्री या बर्थमध्ये बऱ्याच सीट रिकाम्या असतात. एसीमधील बर्थचे तिकीट प्रचंड महाग असते. ते सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे ट्रेन रिकामी घेऊन जाण्यापेक्षा ऑटो अपग्रेड स्कीम रेल्वेने अमलात आणली आहे. या स्कीममध्ये लोअर बर्थच्या पॅसेंजरला अप्पर बर्थमध्ये तर, अप्पर बर्थच्या प्रवाशाला एसी क्लासमध्ये शिफ्ट करण्यात येते.

अशा पद्धतीने काम करते योजना :
रेल्वेची ही योजना अतिशय भन्नाट योजना असून सर्वसामान्यांना फायदा तर होतोच त्याचबरोबर रेल्वेला देखील त्यांच्या या नव्या स्कीमचा भरपूर फायदा होतो. यामध्ये ट्रेन रिकामी जात नाही. समजा फर्स्ट एसीमध्ये चार सीट रिकाम्या आहेत आणि आणि सेकंड एसीमध्ये दोन सीट रिकाम्या आहेत तर, सेकंड एसी वाल्या पॅसेंजरला फर्स्ट एसीच्या बर्थमध्ये शिफ्ट करण्यात येते. त्यानंतर अप्पर आणि लोवर बर्थच्या पॅसेंजरला सेकंड एसीमध्ये शिफ्ट करण्यात येते. अशा पद्धतीने शिफ्टिंग नियम चालू ठेवून लोअर बर्थच्या सीट रिकाम्या होतात. या सिट पटकन भरल्या देखील जातात. त्यामुळे या स्कीमचा पुरेपूर लाभ रेल्वेला मिळतो.

कोणाचे तिकीट अपग्रेड केले जाते :
तुम्हाला आयआरसीटीसीकडून तुमचं तिकीट अपग्रेड करण्यासाठी सांगितलं जाईल. जर तुमचा होकार असेल तरच तुमचे तिकीट ऑटो अपग्रेड होईल नाहीतर नाही होणार. समजा तुम्ही कोणताच उत्तर दिला नाही तर, तुम्ही तिकीट अपग्रेडेशनसाठी तयार आहात असे समजले जाईल.

PNR बदलला जाईल की नाही जाणून घ्या :
समजा अचानक एखाद्या पॅसेंजरचं तिकीट ऑटो अपग्रेड करण्यात आलं तर, त्याच्या पीएनआरमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येत नाही. तिकीट अपग्रेड झाल्यानंतर आपलं मूळ तिकीट कॅन्सल करून मूळ तिकिटाप्रमाणेच रिफंड करण्यात येते.

Latest Marathi News | Railway Ticket Booking 09 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x