28 November 2024 9:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Open Try And Buy | ॲमेझॉनच्या 'या' जबरदस्त सर्विसमुळे केवळ 149 रुपयात घरी येईल OnePlus Open मोबाईल Salary Calculator | बचतीचा महामंत्र, 1 लाख पगार असून सुद्धा बचत होत नाही; मग पगार हातात आल्याबरोबर ही एक गोष्ट करा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, अशी कमाईची संधी सोडू नका - SGX Nifty Railway Ticket Booking | अरेच्चा, चुकीच्या तारखेला तिकीट बुक झालं चिंता नको, या सोप्या पद्धतीने बदला तिकिटाची तारीख BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - SGX Nifty Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, जेफरीज ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला, तेजीचे संकेत - SGX Nifty NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - SGX Nifty
x

Railway Ticket Booking | अरेच्चा, चुकीच्या तारखेला तिकीट बुक झालं चिंता नको, या सोप्या पद्धतीने बदला तिकिटाची तारीख

Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | लांबचा प्रवास करण्यासाठी बरेच प्रवासी रेल्वेचा वापर करतात. रेल्वे ही प्रवाशांना सुरक्षित आणि फायद्याची ट्रान्सपोर्ट सुविधा वाटते. आपण ट्रेनमधून प्रवास करण्याच्या 2 ते 3 दिवस आधी किंवा 1 महिना आधी तिकीट बुक करून ठेवतो. अशातच काही प्रवाशांकडून तिकीट बुक करताना तिकीट डेट चुकीची टाकली जाणे अशा चुका वारंवार होत असतात. तुमच्यासोबत सुद्धा अशी चूक झाली असेल तर, घाबरू नका सोप्या पद्धतीने तारीख बदलता येऊ शकते.

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या चुकीच्या नावाचे आणि चुकीच्या तारखेचे तिकीट बदलून दुसऱ्या एखाद्या प्रवाशाला ट्रान्सफर करण्याची सुविधा प्रदान करते. परंतु या सर्व गोष्टींसाठी रेल्वेने काही नियमांची तरतूद आखली आहे. चुकीची तारीख आणि चुकीचं नाव असलेलं तिकीट बदलण्यासाठी प्रवाशाला केवळ ऑफलाइन पद्धतीने बुक केलेल्या तिकिटाची तारीख आणि नाव बदलता येणार आहे. समजा रेल्वे प्रवाशाने IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन पद्धतीने रेल्वे तिकीट बुक केली असेल तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही.

तिकीट बदलण्याचे आणि ट्रान्सफरचे नियम जाणून घ्या :

समजा तुमच्या तिकिटावरची तारीख आणि नाव चुकीचं पडलं असेल तर, तुम्ही ते तिकीट अगदी सहजरित्या ट्रान्सफर करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ गरीब परिवारामधील व्यक्तीला तिकीट ट्रान्सफर करायचे आहे. ज्यामध्ये त्यांचे आई-वडील, बहिण भाऊ, पती-पत्नी किंवा मुलगा मुलगी या सदस्यांचा समावेश होऊ शकतो.

तिकीट बदलण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा :

1. सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या ती म्हणजे तुम्हाला तिकीट बुक केल्यानंतर नाव बदलण्यासाठी 24 तास आणि तारीख बदलण्यासाठी 48 तास एवढाच वेळ तुमच्याजवळ उपलब्ध असतो. यासाठी तुम्हाला रेल्वेच्या रिझर्वेशन काउंटरवर पोहोचावे लागेल.

2. तुम्हाला तिकीट काउंटरवर तुमचं ओरिजनल तिकीट देत एक अर्ज देखील द्यावा लागेल. त्या अर्जामध्ये तुम्हाला नावामध्ये किंवा तारखेमध्ये बदल करायचा असल्यास तुमची समस्या अर्जामध्ये नमूद करायची आहे.

3. तिकिटाची हेराफेरी करण्यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारण्यात येतील. त्याचबरोबर तुमच्यासाठी नवीन सीट उपलब्ध असेल तरच ही प्रोसेस संपन्न होईल.

4. संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला अपडेट केलेलं तिकीट देण्यात येतं.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Railway Ticket Booking 28 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x