22 January 2025 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
x

Railway Ticket Booking | तुमच्या कन्फर्म तिकीट बुकिंग सीटवर दुसराच कोणीतरी बसला, करा हे एक काम, मिनिटांत मिळेल सीट

Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | दिवाळीचा सण सुरू झाला असून रेल्वेमध्ये प्रवाशांची चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण कुटुंबीयांबरोबर दिवाळी सण साजरी करण्यासाठी बाहेरगावावरून आपल्या मायदेशी परतत आहेत. फेस्टींग सीजन असल्यामुळे सामान्य तसेच राखीव वर्ग यामध्ये प्रचंड वर्दळ पाहायला मिळते. अशातच सणासुदीच्या दिवसांमध्ये रेल्वेने प्रवास करणे वाटते तेवढे सोपे नाही.

बऱ्याचदा आपण तिकीट बुक करूनही आणि सीट कन्फर्म करूनही ट्रेनमध्ये गेल्यावर थोडीशी गल्लत होताना पाहायला मिळते. कोणीतरी दुसराच व्यक्ती आपल्या सीटवर हक्क सांगतो. तुमच्याबरोबर देखील असं नक्कीच झालं असेल, किंवा तुम्ही लांबचा प्रवास करत असाल आणि तुमच्याबरोबर देखील अशी घटना घडली तर, खडबडून किंवा गोंधळून न जाता केवळ ही एक गोष्ट करा. तुमचं काम मिनिटात होईल.

पुढील पद्धतीचा अवलंब करा :
1. संबंधित व्यक्तीची तक्रार करण्यासाठी तुम्ही ट्रेनमध्ये उपस्थित असणाऱ्या अटेंडेंट किंवा टीटीईला संपर्क साधून संबंधित व्यक्तीची तक्रार नोंदवू शकता. समजा तुमच्या ट्रेनमध्ये टीटीई उपलब्ध नसेल तर तुम्ही वेगळे मार्ग देखील शोधू शकता.

2. तुम्ही रेल्वेचे अधिकृत ‘रेल मदत’ हे ॲप्लीकेशन डाउनलोड करून या माध्यमातून संबंधित व्यक्तीची तक्रार नोंदवू शकता. जेणेकरून तुम्हाला तक्रार नोंदवण्यासाठी कोणाशी बातचीत करावी लागणार नाही. तुम्ही थेट ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदणी करू शकता.

3. ट्रेनमधील TTE ने तुमच्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांकावर देखील कॉल करून तक्रार नोंदणी करू शकता. यासाठी 139 या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. रेल्वेचा हा हेल्पलाइन क्रमांक IVRS वर आधारित असतो. एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या समस्या सांगण्यासाठी रेल्वेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत शेअर करू शकता.

139 या हेल्पलाइनच्या माध्यमातून तुम्ही कोण कोणत्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. जाणून घ्या :
1. तुम्हाला एखाद्या गोष्टीची सुरक्षा हवी असेल तर तुम्ही 1 क्रमांक दाबा.
2. तुम्हाला वैद्यकीय गोष्टींची गरज भासत असेल तर तुम्ही 2 क्रमांक दाबा.
3. समजा तुम्ही रेल्वेच्या आजूबाजूच्या परिसरात असाल आणि तुम्हाला रेल्वे अपघाताबाबत माहिती द्यायची असेल. तर, तुम्ही 3 क्रमांक दाबून रेल्वेची माहिती पोहोचवू शकता.
4. रेल्वे संबंधीत तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही 4 क्रमांक दाबू शकता.
5. मालगाडी वाहतूक, किंवा एखाद्या पार्सल संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर 7 क्रमांक दाबा.
6. केलेल्या तक्रारीची मूळ स्थिती काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर 8 क्रमांक दाबा.
7. रेल्वे मधील कोणत्याही भ्रष्टाचाराबद्दल माहिती सांगायची असेल किंवा जाणून घ्यायची असेल तर 9 क्रमांक दाबा.
8. PNR, त्याचबरोबर तिकीट बुकिंग आणि भाड्या संबंधीत फोन करण्यासाठी 0 क्रमांक दाबा.

Latest Marathi News | Railway Ticket Booking 29 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x