21 November 2024 11:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट बुकिंगवेळी ज्येष्ठ नागरिकांना 100 रुपयांचे तिकीट 55 रुपयांत? केंद्र सरकारचा निर्णय काय?

Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | रेल्वे मंत्रालयाने कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात देण्यात येणारी सूट थांबवली होती. त्यानंतर भाड्यातील सवलत पूर्ववत करण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती. इतकंच नाही तर रेल्वे भाडेमाफीचा मुद्दाही खासदारांनी संसदेत उपस्थित केला होता. पण आता सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रेल्वे भाड्यात प्रवाशांना देण्यात आलेली सवलत पुन्हा मिळणार नाही. मोदी सरकार देखील हट्टाला पेटलं असून त्यांना वरिष्ठ नागरिकांना सूट देण्याची अजिबात गरज नाही यावर चर्चा सुरु झाली आहे.

मागणीचा विचार करून निर्णय
अनेक संघटना आणि समित्यांनी लोकांच्या मागणीचा विचार केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यानंतर काही प्रकरणे वगळता कोणत्याही प्रवाशाला रेल्वे भाड्यातून सूट दिली जाणार नाही, असा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला. ही सवलत पुन्हा पूर्ववत न करण्यामागचे कारण म्हणजे भाड्यातील सबसिडी पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. मात्र, अतिरिक्त सूट देणे शक्य होणार नाही.

100 रुपयांचे तिकीट 55 रुपयांत
यापूर्वी रेल्वेमंत्र्यांनीही एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते की, रेल्वे प्रवाशांना १०० रुपयांचे तिकीट ५५ रुपयांत देत आहे. ते म्हणाले होते की, रेल्वे आधीच अनुदानित किट पुरवत आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसह इतर प्रवर्गात २०२० पूर्वी देण्यात आलेली सवलत भविष्यात सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनापूर्वी मार्च 2020 पर्यंत 58 वर्षांवरील महिला आणि 60 वर्षांवरील पुरुषांना भाड्यातून सूट देण्यात आली होती.

रेल्वेने २०२० मध्ये ही सवलत बंद केली होती. त्यावर संसदीय समित्या, विविध संघटना आणि खासदारांनी सूट पूर्ववत करण्याची शिफारस केली होती. मात्र, कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या प्रवाशांना भाड्यात सवलत कायम ठेवण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला होता. येत्या काळात सुविधा वाढविण्यात येतील, असे रेल्वेचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ, वयोवृद्ध आणि महिलांना प्राधान्यक्रमाच्या आधारे खालच्या जागा दिल्या जातील.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Railway Ticket Booking Senior Citizens ticket concession 04 November 2023.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x