2 February 2025 12:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांनो, ही SBI म्युच्युअल फंड योजना महिना 3500 रुपये SIP वर देईल 2 कोटी रुपये परतावा New Income Tax Slab | 12 लाख ते 50 लाख रुपये उत्पन्नावर किती टॅक्स भरावा लागेल आणि बचत किती होईल जाणून घ्या Smart Investment | तुमचा महिना पगार कितीही असला तरी 'या' 3 पर्यायांमध्ये पैसे गुंतवा, कधीच आर्थिक कोंडी होणार नाही 5G Smartphone | स्मार्टफोन प्रेमींनो 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा बजेट तयार ठेवा, कोणते नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार CIBIL Score | 'या' 6 सोप्या स्टेप्समुळे तुमचा सिबिल स्कोर भराभर वाढवेल, 500 हून थेट 800 चा आकडा गाठेल, असं शक्य होइल Home Loan EMI | वयाच्या 40 व्या वर्षी गृहकर्ज घेण्याचा प्लॅन करताय, मग, या 4 गोष्टी लक्षात ठेवा, कर्जाचा डोंगर हलका होईल Mutual Fund SIP | 50 लाखांचे घर खरेदी करताय, मग किती रुपयांची SIP करावी लागेल, मोठी रक्कम कशी मिळेल पहा
x

Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना ठाऊक नाही, काउंटरवरून खरेदी केलेले रेल्वे तिकीट ऑनलाईन कॅन्सल करता येईल

Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | भारतीय रेल्वे म्हणजेच आयआरसीटीसी आपल्या रेल्वे प्रवाशांसाठी एक्सप्रेसच्या वेगाने नवनवीन सुविधा आणण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत आय आरसीटीसीने बऱ्याच रेल्वे सुविधा आपल्या ग्राहकांसाठी सुरू केल्या आहेत. प्रवाशांना कोणताही प्रकारचा त्रास होऊ नये त्याची पूर्णपणे दक्षता घेतली जात आहे.

दरम्यान अनेक व्यक्तींच्या मनात असा प्रश्न उपस्थित होतो की, तिकीट काउंटरवर जाऊन काढलेले रिझर्वेशन तिकीट आपल्याला नको हवं असेल तर, ते ऑनलाईन पद्धतीने कॅन्सल करता येतं का आणि येत असेल तर त्याची नेमकी प्रोसेस काय. आज या बातमीपत्रातून आम्ही सविस्तर माहिती सांगणार आहोत.

तिकीट काउंटरवर काढलेले रिझर्वेशन तिकीट ऑनलाइन पद्धतीने कॅन्सल कसे करायचे :
1. PRS रेल्वे काउंटरवर काढलेले रिझर्वेशन तिकीट कॅन्सल करायचे असल्यास तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आणि संपूर्ण प्रोसेस फॉलो करावी लागेल.

2. IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला कॅन्सल तिकीट म्हणून एक ऑप्शन पाहायला मिळेल. या ऑप्शनमध्ये तुम्हाला तिकीट काउंटर वर काढलेले तिकीट कॅन्सल करण्यासाठीचे आणखीन एक ऑप्शन दिसेल.

3. तिथे तुम्हाला एक वेबसाईट देखील पाहायला मिळेल. तुम्हाला त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे आणि काउंटर तिकीटवरील PNR नंबर आणि ट्रेन नंबर सिक्युरिटी पिनसह कॅपच्या कोड टाकायचा आहे.

4. कॅपचा कोड पूर्ण करून झाल्यानंतर तुमच्या फोनवर एक ओटीपी पाठवण्यात येईल. हा ओटीपी टाकून झाल्यानंतर तुमच्यासमोर तिकीट कॅन्सल करण्याचे ऑप्शन समोर येईल. तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्ही तिकीट काउंटरवर फॉर्म भरताना जो मोबाईल क्रमांक टाकला आहे. तोच मोबाईल क्रमांक वापरायचा आहे. अन्यथा तुम्हाला ओटीपी मिळणार नाही.

5. संपूर्ण प्रोसेस फॉलो करून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचे तिकीट काउंटरवर काढलेले ऑफलाइन तिकीट ऑनलाइन पद्धतीने कॅन्सल करता येते.

तिकिटाचा रिफंड मिळवण्यासाठी काय करायचे :
तिकिटाचे रिफंड मिळवण्यासाठी तुम्हाला PRS रेल्वे काउंटरवर जावं लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला कॅन्सल तिकीट सबमिट करावे लागेल. सबमिट केल्यानंतर लगेचच तुम्हाला तुमच्या तिकिटाचे पैसे रिफंड करण्यात येते. तिकीट काढून झाल्यानंतर कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला 4 तासांचा वेळ उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे या वेळेतच तिकीट कॅन्सल करण्याचा प्रयत्न करा.

Latest Marathi News | Railway Ticket Booking Sunday 02 February 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x