24 November 2024 9:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Gujarat Education Model | गुजरात निवडणुकीत कंटेनरमध्ये इव्हेन्ट शाळा भरवली होती! आता 157 शाळांमधील SSC चे सर्व विद्यार्थी नापास

Highlights:

  • Gujarat Education Model
  • १५७ शाळांमधील सर्व विद्यार्थी नापास
  • ग्रेडनिहाय निकाल
Gujarat Education Mode

Gujarat Education Model | गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (जीएसईबी) गुजरात बोर्ड एसएससी दहावीचा निकाल 2023 दोन दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. यंदा गुजरात बोर्डाचा दहावीचा निकाल ६४.६२ टक्के लागला आहे. दुसऱ्या वर्षीही सुरत जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ७६ टक्के लागला आहे, तर दाहोद जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी ४०.७५ टक्के लागला आहे.

या निकालानंतर गुजरात विकासाचं मॉडेल किती फसवं आहे याची कल्पना येईल. विशेष म्हणजे गुजरातमध्ये सलग २५ वर्ष भाजपाची सत्ता असून स्वतः गुजरातचे असलेले नरेंद्र मोदी दोन टर्म पंतप्रधान पदी विराजमान आहेत.

ग्रेडनिहाय निकाल

गुजरात बोर्डाच्या एसएससी दहावीपरीक्षेच्या निकालानुसार ६१११ विद्यार्थी ए १ ग्रेडसह बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. तर ए 2 ग्रेडमध्ये 44480, बी 1 मध्ये 86611, बी 2: 127652, सी 1: 139248, सी 2: 67373, डी: 3412 आणि ई 1: 6 उत्तीर्ण झाले आहेत. गुजराती विषयात ९६ हजार तर गणित विषयात १ लाख ९६ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

१५७ शाळांमधील सर्व विद्यार्थी नापास

राज्यातील २७२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गुजरातमधील १०८४ शाळांचा निकाल ३० टक्क्यांपेक्षा कमी लागला आहे. १५७ शाळा अशा आहेत, जिथे बोर्डाची परीक्षा देणारा एकही विद्यार्थी उत्तीर्ण झालेला नाही. दुसऱ्यांदा बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या १६५६९० विद्यार्थ्यांपैकी केवळ २७४४६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले आहेत.

राज्यात दहावीची परीक्षा १४ मार्च ते २८ मार्च २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. यावर्षी सुमारे ८ लाख विद्यार्थ्यांनी जीएसईबी एसएससी परीक्षा दिली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gujarat Education Model Exposed check details on 27 May 2023.

हॅशटॅग्स

#Gujarat Education Mode(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x