15 January 2025 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नाही, तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांला नापास करता येणार नाही, पुस्तकाला वह्यांची पानं - शिक्षण मंत्री

Deepak Kesarkar

Maharashtra Education Model | पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा तर तिसरी ते आठवीच्या कोणात्याही विद्यार्थ्यांला नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. याशिवाय महाराष्ट्रात केरळ मॉडेल आधारित शिक्षण पद्धती राबविण्याचे सुतोवाचही केसरकर यांनी केले.

शिक्षण मंत्री दीपक केसरकर काय म्हणाले :
राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, संपूर्ण देशातील अशी जी काही राज्य आहेत, ज्यांनी शिक्षणात प्रगती केली आहे, त्यांचं नाव आहे, अशा राज्यात आमच्या शिक्षणामध्ये विभागाने दौरे केले. त्यात केरळने शिक्षण विभागात अनेक प्रयोग केले, अनेक इनिशिएटिव्ह केरळने शिक्षणात घेतले आहेत. काही मॉडेल जे यशस्वी झालेत ते पुढे न्यावे लागतात. केरळ आणि महाराष्ट्राची तशी तुलना करता येणार नाही. पण केरळसोबत पंजाब, राजस्थानमधून सुद्धा आम्ही मॉडेल घेणार आहोत, विद्यार्थी फोकस सुधारणा आम्ही राज्यात करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

दप्तराचे ओझे कमी
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून आता यापुढे पुस्तकांमध्ये सरावासाठी कोरी पाने जोडली जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेगळ्या वह्या घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. राज्यातील शिक्षण विभागाने विविध राज्यांतील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी दौरे केले होते. त्यापैकी केरळ राज्याने केलेले प्रयोग हे यशस्वी ठरले असून तसे प्रयोग आता राज्यात राबवण्याची तयारी सुरू झाल्याचं बोललं जात आहे.

केरळ पॅटर्न नेमका कसा
राज्यात केरळ पॅटर्न शिक्षण पद्धत राबवण्याचा विचार केला जात आहे. पण हा केरळ पॅटर्न नेमका काय आहे जाणून घेऊयात. प्राथमिक शाळा चालवण्याचे आणि नोकर भरतीचे अधिकारहे ग्रामपंचायतींना असणार आहेत. माध्यमिक शाळांचे अधिकार हे जिल्हा परिषदांना असतील. प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेतली जाईल. कमी मार्क्स मिळाल्यास पुन्हा परीक्षा घेतल्या जातील. दर 10 वर्षांनी अभ्यासक्रमात बदल करण्यात येईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra State adopting Kerala Education Model explained by State education minister check details on 22 November 2022.

हॅशटॅग्स

#Deepak Kesarkar(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x