पदवी परीक्षांना स्थगितीची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई, २७ सप्टेंबर : ‘मुंबई विद्यापीठाच्या १२ जून २०१९च्या परिपत्रकाप्रमाणे अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यापासून प्रत्यक्ष परीक्षा सुरू होईपर्यंत किमान एक महिन्याचा कालावधी विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे. मात्र, यंदा विद्यापीठाने करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे ठरवले असले तरी विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा कालावधी दिलेला नाही’, असे कारण देत १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षेला स्थगिती देण्याची विनंती दोन विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली होती. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी ती विनंती फेटाळून लावली.
‘जून-२०१९चे परिपत्रक हे पदवीच्या पहिल्या व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आहे. मग ते परिपत्रक अंतिम वर्ष/सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेविषयी लागू करण्याचे निर्देश न्यायालय कसे देऊ शकते? विद्यापीठाच्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. तुमच्या ज्या काही अडचणीत असतील त्या तुम्ही विद्यापीठ कुलगुरूंसमोर मांडू शकता’, असे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याचिकादारांच्या वकील अॅड. शॅरोन पाटोळे यांना सुचवले. त्यांनी तशी तयारी दर्शवल्यानंतर विद्यार्थ्यांकडून गाऱ्हाणी मांडण्यात आल्यास कुलगुरूंनी शक्यतो १ ऑक्टोबर रोजी परीक्षा सुरू होण्यापूर्वी योग्य तो निर्णय घ्यावा, असे खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट करून याचिका निकाली काढली.
‘परीक्षांविषयी अनेक महिने संभ्रमाचे वातावरण राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याचे निर्देश २८ ऑगस्ट रोजी दिले. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने ८ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून १ ते १७ ऑक्टोबरचे वेळापत्रक जाहीर केले. ऑनलाइन परीक्षेची पद्धत विद्यार्थ्यांसाठी आणि परीक्षा संच तयार करणाऱ्या प्राध्यापकांसाठीही नवीन आहे. त्यामुळे पुरेसा अवधी मिळायला हवा. राज्य सरकारने परीक्षा संपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत घेतलेली आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल’, असा युक्तिवाद अॅड. पाटोळे यांनी मांडला.
‘१२ जून २०१९च्या परिपत्रकातील मार्गदर्शक तत्त्वे ही केवळ पहिल्या व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांविषयी आहेत. तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ती लागूच नाहीत. शिवाय प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवरील परीक्षेच्या दृष्टीने ती आहेत. शिवाय ती बंधनकारकही नाहीत. ऑनलाइन व बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असून त्याची आवश्यक ती सर्व तयारी विद्यापीठ करत आहे’, असे म्हणणे मांडत विद्यापीठातर्फे अॅड. रुई रॉड्रिग्ज यांनी याचिकादारांच्या विनंतीला तीव्र विरोध दर्शवला.
News English Summary: The Bombay High Court on Saturday refused to intervene in the Mumbai University’s decision to conduct final year examination for its undergraduate courses from October 1. A Bench of Chief Justice Dipankar Datta and Justice G.S. Kulkarni directed two university students who had petitioned the court, seeking a stay on the examinations, to instead approach the vice-chancellor for any relief that they sought. The university’s counsel Rui Rodrigues told the Bench on Saturday that the examinations will be conducted online in a multiple-choice question format.
News English Title: Mumbai high court rejected request for adjournment of degree examinations Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON