26 January 2025 11:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या 3 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा, पैशाने पैसा वाढवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा
x

चिंतामणीरावांच्या नजरेतून

संदर्भ : हे आहेत चिंतामणीराव, एक सामान्य मराठी माणूस अगदी आपल्यासारखाच. रोजच्या रोज त्यांच्या वाचनात येणाऱ्या बातम्या असतात त्या थोड्या थोडक्या कर्जाला कंटाळून एक शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसऱ्या बातम्या असतात त्या एखाद्या कुटुंबाने कर्जाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केली. तसं ही या बँका त्यांच्या सारख्या सामान्य माणसाला कुठे सहज कर्ज देतात आणि तुटपुंज कर्ज जरी दिलं तर त्या मोबदल्यात त्याचं संपूर्ण आयुष्यच म्हणजे घर-दार, शेतीवाडी सर्वच तारण ठेऊन घेतात.

परंतु चिंतामणीराव आज जे बँकिंग क्षेत्रात होणारे भले मोठे घोटाळे अनुभवत आहेत त्याने ते प्रचंड व्यतीत झाले आहेत. त्यांना असं वाटू लागलं आहे की, एखादया सामान्य माणसाला तुटपुंज्या कर्जासाठी नियम, तारण आणि कागद पत्रांचा ढीग या बँका मागवून घेतात. त्या बँका ह्या खऱ्या अर्थाने केवळ श्रीमंतांच्याच असतात असं त्यांचं मत झालं आहे.

सरकार बदलून ‘अच्छे दिन’ येतील या अपेक्षेने ते बसले होते, परंतु त्यांचा निव्वळ भ्रमनिरास झाला आहे. तुम्हीच बघा वर ते काय म्हणत आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x