5 November 2024 5:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
x

MHT-CET 2020 | पीसीबी ग्रुपचे Admit Card प्रसिद्ध

MHT CET Admit Card 2020, Admit Card PCB Group, CET Exam 2020, MHT CET Exam 2020

मुंबई, २७ सप्टेंबर : MHT-CET Admit Card 2020, महाराष्ट्र राज्याच्या सीईटी कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात MHT-CET 2020 परीक्षेचे Admit Card सीईटी सेलने आज, शनिवार २६ सप्टेंबर पासून उपलब्ध केले आहेत. विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. ते कसे डाऊनलोड करायचे याबाबतचा सविस्तर तपशील आम्ही या वृत्तात पुढे देत आहोत.

हे Admit Card केवळ PCB ग्रुपचे आहेत. एमएचटी-सीईटी परीक्षा १, २, ४, ५, ६, ७, ८ आणि ९ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या MHT-CET अॅप्लिकेशन फॉर्म नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने हे हॉलतिकीट डाऊनलोड करायचे आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच PCM ग्रुप परीक्षेचे Admit Card अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.

यापूर्वी बी.फार्मसाठी सीईटी सेलने Admit Card जारी केले आहेत. हॉलतिकिटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. तसेच कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर घ्यावयाच्या खबरदारीविषयीदेखील Admit Card मध्ये विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी Admit Card वरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, त्यात कोणत्याही प्रकारची चूक वा त्रुटी आढळल्यास संबंधित यंत्रणेशी तत्काळ संपर्क साधायचा आहे.

MHT CET Admit Card 2020 कसे डाऊनलोड कराल?

  • mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • MHT CET Admit Card 2020 डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.
  • अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
  • आता स्क्रीनवर तुमचे MHT CET Admit Card 2020 Admit Card दिसेल.
  • Admit Card डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट काढून सुरक्षित ठेवा.
  • Admit Card डाऊनलोड कसे करायचे याची विस्तृत प्रोसेस सीईटी कक्षाने दिली आहे.

MHT CET Admit Card 2020 डाऊनलोड करण्याची प्रक्रिया वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

News English Summary: MHT CET Admit Card 2020. Maharashtra CET Cell on Saturday released the admit card for the MHT CET 2020 examination for PCB group on its official website. Candidates who have registered for the entrance examination can download their hall tickets online at mhtcet2020.mahaonline.gov.in. The MHT CET exam for PCB group is scheduled to be conducted from October 1 to 9, 2020, at various centres spread across the state. The admit card for MHT CET 2020 exam will contain details such as- exam date and time, MHT CET exam centre address, candidate personal details and exam day instructions along with COVID-19 guidelines.

News English Title: MHT CET Admit Card 2020 Admit Card PCB Group Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CET EXAM 2020(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x