23 February 2025 2:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

MHT - CET २०२० | परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर

MH CET Exam 2020, State Common Entrance Test, NEET, Marathi News ABP Maza

मुंबई, 9 सप्टेंबर: एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.

सुप्रीम कोर्टानं सीईटी घेण्यास अधिकृत परवानगी दिल्यानंतर आणि उच्च आणि तांत्रिक शिक्षण विभागाच्या सीईटी सेलनं परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. या तारखा पुढीलं प्रमाणे.

१) पीसीबी ग्रुप – १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ ऑक्टोबर २०२०
२) पीसीएम ग्रुप – १२, १३, १४, १५, १६, १९, २० ऑक्टोबर २०२०

त्याचबरोबर परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक हे सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना या वेबसाईटवरुन डाऊनलोड करता येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेसंदर्भातील ताज्या अपडेट आणि सूचना जाणून घेण्यासाठी www.mahacet.org या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन सेलकडून करण्यात आले आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षा यामध्ये अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्स्चर , कृषी अभ्यासक्रम, हॉटेल मॅनेजमेंट, लॉ अभ्यासक्रम या सारख्या अभ्यासक्रमाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा CET परीक्षा घेण्यात येतात.

विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये समुपदेशन केंद्राची निर्मिती:
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक आणि मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात यावी. समुपदेशन केंद्राच्या मदतीने संबंधित जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान करण्यात येईल, अशा सूचना उदय सामंत यांनी याआधीच दिल्या आहेत.

 

News English Summary: MH CET Exam Date 2020 – State Common Entrance Test Cell, State of Maharashtra has Postponed MH CET Exam Date 2020, and Check official Notification at mahacet.org. Maharashtra Common Entrance Test (MH CET) is conducted by the State Common Entrance Test Cell, Mumbai for admissions to first-year Engineering and Technology programmes (BE/BTech) and Pharmacy programmes (B Pharm/Pharm D) in the state. Students can check the New Maharashtra MH CET Exam Date 2020 latest Updates, MH CET Exam Date 2020 Schedule, Admit Card, Result Dates.

News English Title: Exam 2020 Maharashtra State Common Entrance Test Cell Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CET EXAM 2020(3)#NEET EXAM 2020(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x