27 December 2024 7:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

CET Online Application | विद्यार्थ्यांनो... वेबसाईट सुरळीत होताच ११'वी प्रवेशासाठी असा ऑनलाईन अर्ज करा - स्टेप बाय स्टेप

How to apply for CET Examination online

मुंबई, 22 जुलै | 21 ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी http://cet.mh-ssc.ac.in/ हे संकेतस्थळ ज्यावर विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरत होते ते तांत्रिक कारणास्तव बंद ठेवण्यात आले असून अर्ज भरण्याची ऑनलाइन सुविधा पूर्ववत सुरू झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

20 जुलै सकाळी साडे अकरा वाजल्यापासून ते 26 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. कालपासून 11 वी सीईटी परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचे http://cet.mh-ssc.ac.in/ संकेतस्थळवर विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. शिवाय, काल आणि आज बराच वेळ हे संकेतस्थळ बंद झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी बोर्ड तसेच शिक्षण विभागाला प्राप्त होत होत्या.

मात्र संकेतस्थळ ठीक होताच खालील माहितीप्रमाणे ऑनलाईन अर्ज करा:

मोबाईलवर देखील भरू शकता सीईटी अर्ज:
सीईटी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मी या ठिकाणी कॉम्प्युटरचा वापर करत आहे. तुम्ही वरील व्हिडीओ बघून तुमच्या मोबाईलवर देखील हा अर्ज सादर करू शकता. कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर अर्ज भरण्यासाठी दोन्ही ठीकानी पर्याय सारखेच आहेत. फक्त कॉम्प्युटरचा इंटरफेस आणि मोबाईलचा इंटरफेस वेगवेगळे दिसतील. म्हणजेच हा अर्ज कॉम्प्युटरवर जरी मी सादर करत असलो तरी याच पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर हा अर्ज भरू शकता.

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत:
* तुमच्या कॉम्प्युटरमधील किंवा मोबाईल मधील वेब ब्राउजर ओपन करा.
* वेब ब्राउजरच्या सर्च बारमध्ये https://cet.mh-ssc.ac.in/ लिंक टाका.
* तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाइलच्या स्क्रीनवर Maharashtra state board of secondary and higher secondary education pune यांची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
* अर्ज करण्याअगोदर या वेबसाईटवर अनेक सूचना दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचून घ्या.
* Board Type मध्ये Maharashtra state board students (Appeared in 2021 Exam) या पर्यायावर क्लिक करा.

सीईटी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पुढे चालू ठेवा:
* पेजला थोडे खाली स्क्रोल करा.
* I have read all above instructions या सओरील चौकोनात टिक करा.
* Seat Number या चौकोनात इयत्ता १० उत्तीर्ण परीक्षेचा बैठक क्रमांक टाका.
* Mother Name या चौकटीत आईचे नाव टाका. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा कि आईच्या नावाचे स्पेलिंग एकदम बरोबर टाईप करा.
* Submit या बटनावर क्लिक करा.
* सबमिट या बटनावर क्लिक करताच काही माहिती या ठिकाणी आपोआप येईल आणि काही माहिती विद्यार्थ्यांना भरावी लागेल.

पुढील माहिती काळजीपूर्वक भरा:
* Board Details मध्ये आपोआप नंबर येईल.
* Personal Details नाव, मोबाईल नंबर, लिंग, जन्मतारीख, आधार नंबर, पत्ता, जातीचा प्रवर्ग हि आणि इतर माहिती आपोआप येईल काही माहिती मात्र या ठिकाणी विद्यार्थांना टाकावी लागणार आहे.
* इमेल आयडी टाईप करा.
* Medium of instructions मध्ये जी भाषा हवी असेल ती दिलेल्या पर्यायामधून निवडा.
* Examination center या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवडायचे आहे. त्यासाठी District या चौकटीमध्ये तुम्म्हला ज्या जिल्ह्यामध्ये हि परीक्षा द्यायची असेल त जिल्हा निवडा.
* Select Taluka या चौकटीमध्ये तालुका निवडायचा आहे.
* हि सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर Submit या बटनावर क्लिक करा.
* त्यानंतर तुम्ही भरलेल्या माहितीची प्रिंट निघेल ती प्रिंट तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये pdf मध्ये डाउनलोड करून घ्या किंवा तुमच्या कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला असेल तर प्रिंट काढून घ्या.
* हा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी लिंक कॉपी करा https://cet.mh-ssc.ac.in/

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to apply for Maharashtra CET Examination online in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#CET EXAM 2021(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x