22 December 2024 8:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

MH-CET 2020 Exams | उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी पुन्हा पुढे ढकलल्या

MHT CET 2020, CET Exam 2020, NEET Exam 2020, JEE NEET Exam

मुंबई, २९ सप्टेंबर : MHT-CET Revised Dates 2020: सीईटी सेलच्या वतीने ऑक्टोबर मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा एकाच वेळी होत असल्याने त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी झाल्यानंतर आता या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. आता या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात न होता ऑक्टोबर मध्ये तारखांत पुन्हा बदल केल्याचे परिपत्रक सीईटी सेलने जारी केले आहे.

राज्यात विद्यापीठांच्या परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरू होत असून साधारण २१ ऑक्टोबपर्यंत या परीक्षा आहेत. सध्या पुनर्परीक्षार्थीच्या (बॅकलॉग) परीक्षा सुरू आहेत. याच दरम्यान परीक्षा नियमन प्राधिकरणानेही प्रवेश परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. प्रवेश परीक्षा द्यावी की, अंतिम वर्षांची परीक्षा द्यावी, अशा पेचात प्रवेशोत्सुक विद्यार्थी सापडले असल्याची तक्रारही प्राध्यापक संघटनेने केली होती. या मुळे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आठ दिवसात पुन्हा तारखा बदलाव्या लागल्या आहेत. या प्रवेश परीक्षांबाबत अधिक माहिती www.mahacet.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

उच्चशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षाचे सुधारित वेळापत्रक

अभ्यासक्रम – सीईटीच्या पूर्वीच्या तारखा / नव्या तारखा:

  • एमपीएड – ३ ऑक्टोबर, फिल्ड टेस्ट ४ ते ७ ऑक्टोबर — २९ ऑक्टोबर, फिल्ड टेस्ट ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर
  • एमएड – ३ ऑक्टोबर — ५ नोव्हेंबर
  • बीएड/एमएड सीईटी – १० ऑक्टोबर — २७ ऑक्टोबर
  • एलएलबी ( पाच वर्षे) – ११ ऑक्टोबर — ११ ऑक्टोबर
  • एलएलबी (तीन वर्ष) –२ आणि ३ नोव्हेंबर
  • बीपीएड – ११ ऑक्टोबर, फिल्ड टेस्ट १२ ते १६ ऑक्टोबर — ४ नोव्हेंबर, फिल्ड टेस्ट ५ ते ८ नोव्हेंबर
  • बीए/ बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड – ११ ऑक्टोबर — १८ ऑक्टोबर
  • एम-आर्च सीईटी – ३ ऑक्टोबर — २७ ऑक्टोबर
  • एम- एचएमसीटी – ३ ऑक्टोबर –२७ ऑक्टोबर
  • एमसीए – १० ऑक्टोबर — २८ ऑक्टोबर
  • बी-एचएमसीटी – १० ऑक्टोबर — १० ऑक्टोबर

सीईटीचे सुधारित वेळापत्रकाचे परिपत्रक पुढीलप्रमाणे – क्लिक करा

 

News English Summary: MHT-CET 2020 Revised Dates. The various entrance exams to be held in October by the CET Cell and the final year exams of the universities are being held at the same time. The CET cell has issued a circular to change the dates again in October, not the first week of October.

News English Title: MHT CET 2020 revised dates higher education Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CET EXAM 2020(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x