22 January 2025 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

मनसुखच्या हत्येसाठी आरोपींनी 45 लाखांची सुपारी दिली | एनआयची कोर्टात माहिती

Mansukh Hiren

मुंबई, ०४ ऑगस्ट | अँटिलिया बाहेरील स्फोटकासह सापडलेल्या कार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून(एनआयए) सुरू आहे. या प्रकरणाशी निगडीत मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयने एक नवीन धक्कादायक खुलासा कोर्टात केला आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींनी एका आरोपीला तब्बल 45 लाख रुपयांची सुपारी दिली होती, अशी माहिती एनआयएने न्यायलायत दिली आहे. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणात कोर्टात चार्जशीट दाखल करण्यासाठी आणखी तीस दिवसांची वेळ मागितली आहे.

25 फेब्रुवारी 2021 ला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण-मुंबई इथल्या अँटिलिया निवास स्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली एक गाडी ठेवली होती. मात्र ही कार मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. ही कार चोरी झाली आहे, अशी तक्रार त्याने दिली होती. मात्र 5 मार्च रोजी मनसूखचा मृतदेह ठाणे इथल्या रेतीबंदर येथे सापडला होता.

एन आय एनं आता पर्यंत दीडशे जणांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच या प्रकरणात एकाचा जबाब दिल्लीमध्ये जाऊन नोंदवला गेला आहे. या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशलिस्ट आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे या दोघांना अटक केली असल्याचे देखील कोर्टात एनआयएकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान एनआयएने या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे आणखी 30 दिवसांचा अवधी मागितला आहे. तर चार्जशीट दाखल झाला नाही म्हणून सचिन वाझे याने यापूर्वी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: 45 lakh was paid to one accused for murder of Mansukh Hiren NIA told to court news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x