14 January 2025 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा
x

बलात्काराच्या आरोपांवर धनंजय मुंडेंकडून सविस्तर खुलासा | विषय न्यायालयात देखील

A rape complaint, Dhananjay Munde, Oshiwara police station

मुंबई, १२ जानेवारी: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बॉलिवूडमधील गायिका रेणू शर्मा हीने तक्रार दाखल केली आहे. बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी तसेच चित्रपट जगातील मोठे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याकडून काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून धनंजय मुंडे यांनी वारंवार बलात्कार केल्याचे रेणू शर्मा हिने तक्रारीत म्हटले आहे.

रेणू शर्मा हिने मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, लैंगिक शोषण, मानसिक व शारीरिक छळ तसेच लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू शर्माने केला आहे. रेणू शर्मा हिने तक्रारीची एक प्रत सोशल मीडियावर ट्वीट करून लोकांना यासंदर्भात माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये तिने मुंबई पोलीस, धनंजय मुंडे, शरद पवार, सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सुद्धा टॅग केले आहे.

दरम्यान, मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एका महिलेनं धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला होता. या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी खुलासा केला आहे. कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी एका महिलेने स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत, असं खुलासा मुंडे यांनी केला आहे.

#समाजमाध्यमांमध्ये_माझ्या_विरुध्द_होणारे_आरोप #पूर्णपणे_खोटे_बदनामी_आणि_ब्लॅकमेल_करणारे_आहेत

कालपासून समाज…

Posted by Dhananjay Munde on Tuesday, January 12, 2021

करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

मोबाईल वरून ब्लॅंकमेलिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितल्याचे एसएमएसचे पुरावे माझ्याकडे आहेत. दबाव तंत्राचा सुद्धा हा भाग असू शकतो. या सर्व प्रकरणाची संबंधीतांकडून योग्य चौकशी केली जाईल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

 

News English Summary: A rape complaint has been lodged against Social Justice Minister Dhananjay Munde at Oshiwara police station. Bollywood singer Renu Sharma has lodged a complaint. In her complaint, Renu Sharma alleged that Dhananjay Munde had repeatedly raped her in order to launch in Bollywood as well as to get work from the world’s biggest producers and directors. Dhananjay Munde has revealed after this case.

News English Title: A rape complaint has been lodged against Social Justice Minister Dhananjay Munde at Oshiwara police station news updates.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x