पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली | पोलीस जबाबात माहिती

पुणे, १४ फेब्रुवारी: पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत असल्याने सर्वच राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांकडून चौकशीचा अहवाल मागवला आहे. यावर पुणे पोलिसांनी “पूजा चव्हाण प्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार असे सांगतानाच कायदेशीर अडचणींमुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही”, असे स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली, असा जबाब पूजासोबत असलेल्या दोघांनी दिल्याची माहिती मिळत आहे. इतकच नाही तर रुममध्ये वाईनच्या वाटल्याही सापडल्याची माहिती मिळत आहे. वानवडी पोलिसांनी अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांचा जबाब नोंदवला आहे. या जबाबानुसार आता पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान पूजा चव्हाण प्रकरणावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. या प्रकरणात शिवसेनेच मंत्री संजय राठोड यांचंही नाव घेतलं जात आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर शिवसेनेचे नेते मात्र याबाबत अधिक स्पष्टपणे बोलताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर आता पूजा चव्हाण प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आलाय. पूजा चव्हाणने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडल्याचा जबाब पूजासोबत असलेल्या दोघांनी पोलिसांना दिल्याची माहिती मिळत आहे.
पूजा चव्हाणच्या आई-वडिलांचा जबाबत पोलिसांनी यापूर्वीच नोंदवला आहे. या घटनेचा उलगडा होण्यापर्यंत तपास सुरु राहणार आहे. पोलीस महासंचालकांनी पुणे पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मिळतेय. पण पोलीस मात्र याबाबत अधिकृतपणे बोलत नाहीत. दरम्यान आज उशिरापर्यंत पोलीस महासंचालकांना चौकशी अहवाल सादर केला जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
News English Summary: A shocking revelation has come to light in the Pooja Chavan suicide case. It is learned that Pooja did not commit suicide but got dizzy. Not only that, but there are reports of wine being found in the room. Wanwadi police have recorded the statements of Arun Rathore and Vilas Chavan. According to this reply, the Pooja Chavan case is now likely to get a new twist.
News English Title: A shocking revelation has come to light in the Pooja Chavan suicide case news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
NHPC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, SELL रेटिंग, PSU एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला - NSE: NHPC
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON