22 December 2024 8:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

बेहिशोबी मालमत्ता प्रकरण | चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल

ACB filed, Case against, BJP leader Chitra Wagh, husband Kishor Wagh

मुंबई, २७ फेब्रुवारी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेची वारंवार मागणी करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या पूर्वी किशोर वाघ यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता त्यांची या प्रकरणात चौकशी होणार आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 12 फेब्रुवारी रोजी किशोर वाघ यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात चित्र वाघ या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी लावून धरलेली आहे. त्याचवेळी चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे.

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना २०१६ मध्ये लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू होता. आता या प्रकरणाच्या तपासादरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता गुन्हा दाखल केला आहे. किशोर वाघ यांच्या विविध शहरात असलेल्या मालमत्तांपैकी ९० टक्के मालमत्ता ही बेहिशेबी मालमत्ता असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे एक कोटींहून अधिकची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा दावा केला जात आहे.

 

News English Summary: BJP leader Chitra Wagh’s husband Kishore Wagh, who has repeatedly demanded the arrest of Forest Minister Sanjay Rathore in the Pooja Chavan suicide case, has been booked in a disproportionate assets case. Earlier, Kishor Wagh was arrested in the case. He will now be questioned in the matter. Therefore, there are signs that the problems of Chitra Wagh are increasing.

News English Title: ACB filed a case against BJP leader Chitra Wagh husband Kishor Wagh news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x