14 January 2025 6:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

सचिन वाझे स्कॉर्पिओत धमकीचे पत्र ठेवायला विसरले आणि पुन्हा पत्र ठेवण्यासाठी आले तिथेच फसले

NIA, Sachin Vaze, Caught on CCTV

मुंबई, २७ मार्च: उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घरासमोर आढळलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणावरुन राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती मोठे पुरावे लागले आहेत. सीसीटीव्हीमधून समोर आलेल्या माहितीनुसार, सचिन वाझेने 25 फेब्रुवारी रोजी अँटिलियासमोर स्कॉर्पिओ उभी करताना त्यामध्ये धमकीचे पत्र ठेवायला विसरले होते. परंतु, काही वेळानंतर त्याच्या लक्षात आल्यावर त्याने इनोव्हा गाडीने परत येऊन त्यामध्ये पत्र ठेवले. हा सगळा प्रकार सीसीटीमध्ये कैद झाला. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे हाती मोठे पुरावे लागले असून यामुळे सचिन वाझेच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

NIA’ सूत्रांच्या माहितीनुसार, या सर्व घडामोडीमध्ये सचिन वाझे एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातकैद झाला. त्यामध्ये त्याने पांढऱ्या रंगाचा सैल कुर्ता-पायजामा घातलेला होता. दरम्यान सचिन वाझेने ठेवलेल्या पत्रात असे लिहले होते की, ‘प्रिय नीता भाभी आणि मुकेश भैय्या आणि कुटुंबीय, हे फक्त ट्रेलर आहे. पुढच्यावेळी आपल्या कुटुंबियांजवळ उड्डाण भरण्यासाठी पुरेसा सामान असेल. काळजी घ्या.’

मागील आठवड्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने यासंबंधी पुरावे गोळा करण्यासाठी सचिन वाझेकडून काही सीन रिक्रिएट केले होते. ज्यामध्ये त्याला मध्यरात्री घटनास्थळावर सैल कुर्ता-पायजामा घालून स्कॉर्पिओपर्यंत चालवले होते. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणा सचिन वाझे यांनी आरोप करताना वापरलेल्या गाड्यांच्या शोधात आहे. यामध्ये एक ‘ऑउटलँडर’ गाडी आहे. यापुर्वी एनआयएने पाच गाड्या आणि महाराष्ट एटीएसने एक गाडी जप्त केली होती. एटीएसने जप्त केलेल्या गाड्यांचा तपशील राष्ट्रीय तपास यंत्रणेला सोपवले आहे.

 

News English Summary: According to NIA sources, Sachin Vaze was caught on CCTV in a shop during the incident. He was wearing a white loose kurta-pajamas. Meanwhile, in a letter kept by Sachin Vaze, it was written, ‘Dear Nita Bhabhi and Mukesh Bhaiya and family, this is just a trailer. Next time, your family will have enough luggage to fly. Be careful.

News English Title: According to NIA sources Sachin Vaze was caught on CCTV in a shop during the incident news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x