1 January 2025 5:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | नोकरी असो किंवा व्यवसाय महिन्याला पेन्शन हवी असेल तर, 'हा' मार्ग ठरेल फायद्याचा NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉकला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड सहित डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, 33% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबद्दल खुशखबर आली, मल्टिबॅगर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: SUZLON
x

मोदींच्या मंत्रिमंडळातील 42% मंत्र्यांविरुद्ध गंभीर गुन्हेगारी खटले | नवे गृह राज्यमंत्री तर हत्येतील आरोपी - ADR रिपोर्ट

ADR Report

नवी दिल्ली, १० जुलै | मोदी सर्वच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता तर आहेच, पण त्याहून अधिक बदनामी होण्याचीच अधिक शक्यता निर्माण झाली आहे. कारण मोदींसोबत कशा प्रकारचे नेते निवडले गेले आहेत आणि त्याचं फलित काय मिळणार याचा देखील अंदाज येऊ शकतो. साधी नोकरी करणाऱ्या सामान्य माणसाला नोकरी देताना देखील मालक चौकशी करून नेमणूक करतो. पण मोदी शहा यांनी देश कशा लोकांच्या हातात दिला आहे याचा देखील अंदाज येऊ शकतो.

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील जास्तीत जास्त मंत्र्यांवर खून आणि खूनाचा प्रयत्न करण्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे. यातील अनेक मंत्र्यांजवळ कोट्यवधीची संपत्ती आहे. नॅशनल इलेक्शन वॉच आणि एडीआरच्या नवीन अहवालात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

मोदी सरकारमधील तब्बल 42 टक्के मंत्र्यांविरुद्ध गुन्हेगारी स्वरुपाचे खटले दाखल आहेत. मंत्रिमंडळातील 78 पैकी 33 जणांनी तशी माहिती दाखल केलेली आहे. पश्चिम बंगालमधील खासदार व गृह राज्यमंत्री निशीथ प्रमाणिक यांनी आपल्याविरुद्ध हत्येसंबंधी खटला सुरू असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय जॉन बारला, पंकज चौधरी व व्ही. मुरलीधरन या मंत्र्यांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचे आरोप आहेत.

नवीन गृहमंत्र्यांवर हत्येचा आरोप:
निशीथ प्रामाणिक हे मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात कमी वयाचे मंत्री आहेत. प्रामाणिक हे पश्चिम बंगालमधून खासदार असून आता गृहराज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला आहे. निशीथ प्रामाणिक हे 35 वर्षाचे असून त्यांचे शिक्षण 8 वी पर्यंत झाले आहे. त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचा गुन्हेगारी खटला दाखल आहे.

15 टक्के मंत्र्यांची शैक्षणिक पात्रता 8 ते 12 वी:
मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातील 15 टक्के म्हणजेच 12 मंत्र्यांचे शिक्षण हे 8 ते 12 वी दरम्यान झालेले आहे. तर दुसरीकडे 64 मंत्र्यांनी आपले शिक्षण पदवी व त्यापेक्षा अधिक दाखवलेले आहे. यातील दोन मंत्र्यांने आपली शैक्षणिक पात्रता डिप्लोमा दाखवले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: ADR report on new union cabinet minister’s crime record news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x