भाजप नेते विखे पाटलांच्या हॉस्पिटल लॅबमधून कोरोनाचा खोटा अहवाल | गुन्हा दाखल
नगर, ३० डिसेंबर: कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खोटा अहवाल दिल्याप्रकरणी विळदघाट येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलमधील क्रस्ना डिग्नोस्टिकस प्रा. लि लॅबचे प्रभारी अधिकारी, लॅब टेक्निशिन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार १३ ऑगस्ट २०२० ते ११ नोव्हेंबर २०२० या काळात घडला आहे. (Ahmednagar lab officer of Vikhe Patil hospital booked for providing wrong covid 19 test report)
स्थानिक बांधकाम व्यावसायिक अशोक खोकराळे यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांचे वडील बबनराव नारायण खोकराळे (वय ७९ वर्ष) यांचे दोन बनावट व खोटे करोना पॉझिटिव्ह रिपोर्ट तयार करुन फिर्यादीची व त्यांच्या कुटुंबाची फसवणूक केली, असे या तक्रारीत म्हटले आहे. बबनराव खोकराळे यांना १३ ऑगस्ट २० रोजी घशात खवखव होत असल्याने हॉटेल पतियाळा हाऊस कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते. तेथून त्यांना परस्पर न्युक्लिअस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. १६ ऑगस्ट रोजी त्यांना करोना झाल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यानंतर १८ ऑगस्टला त्यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. १९ ऑगस्टला अमरधाममध्ये अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर खोकराळे यांनी उपचारांची कागदपत्रे काही तज्ज्ञांना दाखवली असता रिपोर्टबाबत शंका उपस्थित झाली. त्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.
त्यानंतर विळद घाटातील डॉ. विखे मेमोरियल हॉस्पिटलमधील क्रस्ना डिग्नोस्टिक लॅबमध्ये चौकशी केली असता तेथे बबनराव खोकराळे यांचे सलग दोन दिवस आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट केल्याचे अहवाल मिळाले.
तत्पूर्वी, सध्या फरार असलेला नाशिकचा लिकर किंग अतुल मदन प्रकरणात राधाकृष्ण विखे-पाटील (liquor king Atul Madan connection with BJP leader Radhakrishna Vikhe Patil) अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती. नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा जप्त केला होता. हा मद्यसाठा लिकर किंग अतुल मदनच्या वाईन शॉपमध्ये जात असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अतुल मदन याचे नाशिकमधील 14 वाईन शॉप सील करण्यात आले होते. हा मद्यसाठा विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्यातून आल्याचा संशय उत्पादन शुल्क विभागाला आहे.
News English Summary: Dr. Padma Shri from Viladghat for falsely reporting that Corona was positive. Krasna Diagnostics Pvt. Ltd. at Vitthalrao Vikhe Patil Memorial Hospital. The officer in charge of the lab, Lab Technician, has been charged with fraud. This type occurred between 13 August 2020 and 11 November 2020.
News English Title: Ahmednagar lab officer of Vikhe Patil hospital booked for providing wrong covid 19 test report news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON