22 November 2024 12:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अर्णब गोस्वामींच्या चौकशीला कोर्टाचा हिरवा कंदील | रोज कारागृहात ३ तास चौकशी

Alibaug Sessions Court, Arnab Goswami, Taloja Prison

मुंबई, ९ नोव्हेंबर: वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीला अलिबाग सत्र न्यायालयाने आज हिरवा कंदील दाखवला आहे आणि त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं असून, तिथेच दररोज तब्बल ३ तास चौकशी करण्याची परवानगी कोर्टाने पोलिसांना दिली आहे.

रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक प्रकरणात अटक केली होती. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. कोर्टाने पोलिसांच्या मागणीनंतर दररोज ३ तास चौकशी करण्याची परवानगी रायगड पोलिसांना दिली आहे.

दरम्यान, रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, हायकोर्टात देखील गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई हायकोर्टानं त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश गोस्वामी यांना दिले आहेत.

 

News English Summary: The Alibaug Sessions Court today gave the green light to the inquiry of Arnab Goswami, editor-in-chief of Republic TV, who was arrested in connection with the suicide of architect Anvay Naik, adding to Arnab Goswami’s woes. Goswami has been lodged in Taloja Jail, where the court has allowed the police to interrogate him for three hours every day.

News English Title: Alibaug Sessions Court Allows Police To Question Arnab Goswami For 3 Hours Daily In Taloja Prison News updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x