अनिल अंबानींच्या ३ कंपन्यांची बँकेत फ्रॉड खाती | आर्थिक अफरा-तफरी | ना ED ना CBI

मुंबई, ७ जानेवारी: मोदी सरकार देशभर विरोधकांच्या मागे ईडी, CBI आणि इन्कम टॅक्स खात्याच्या चौकशी लावून विरोधकांना त्रास देत असल्याचा आरोप नेहमीच करण्यात येतोय. त्यात सर्वाधिक भर हा ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही तिथल्या विरोधकांना लक्ष केलं जातं. सध्या महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि त्यांचे नातेवाईक विशेष लक्ष आहेत.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार उद्योगपतींचं असल्याचा आरोप सातत्याने करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागील काही काळापासून अनिल अंबानी यांचं नाव अनेक चुकीच्या आर्थिक विषयात पुढे येऊन देखील मोदी सरकारकडून कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे त्यांच्या कंपनीच्या कर्जामुळे राष्ट्रीयकृत बँकांना मोठं आर्थिक नुकसान होऊन NPA मध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स टेलिकॉम आणि रिलायन्स इन्फ्राटेल या तीन कंपन्यांची बँक खाती ‘फ्रॉड खाती’ म्हणून घोषीत करण्यात आल्याची माहिती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने (SBI) दिल्ली उच्च न्यायालयात दिली आहे. या तिन्ही कंपन्यांची मालकी उद्योगपती अनिल अंबानी यांच्याकडे आहे.
एसबीआय’चा निर्णय अनील अंबानी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अनिल अंबानींच्या तीन कंपन्यांच्या बँक खात्यांचे ऑडिट केले असता त्यात निधीचा दुरुपयोग, चुकीच्या पद्धतीने हस्तांतरण आणि अफरा-तफरी झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच तिन्ही खात्यांना ‘फ्रॉड’ यादीत टाकण्यात आलं आहे, असं बँकेने कोर्टात नमूद केलं आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार अनिल अंबानी यांच्या तिन्ही कंपन्यांची स्टेट बँकेकडे ४९ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात रिलायन्स इन्फ्राटेलच्या १२ हजार कोटींच्या थकबाकीचा समावेश आहे. तर रिलायन्स टेलिकॉमने २४ हजार कोटी थकवले आहेत.
News English Summary: SBI’s decision is being hailed as a major setback for Anil Ambani. An audit of the bank accounts of three of Anil Ambani’s companies has revealed misuse of funds, improper transfers and scams. That is why all the three accounts have been included in the ‘fraud’ list, the bank said in court. According to sources, Anil Ambani’s three companies have arrears of Rs 49,000 crore with SBI. This includes Reliance Infratel’s arrears of Rs 12,000 crore. Reliance Telecom has spent Rs 24,000 crore.
News English Title: Anil Ambanis reliance companies bank accounts declared fraud Delhi high court after SBI audit news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC