16 April 2025 9:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

समन्स बजावूनही अनिल देशमुख ED चौकशीला गैरहजर | वकिलांनी स्पष्ट केलं कारण

Anil Deshmukh

मुंबई, १८ ऑगस्ट | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि देशमुख यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आज पाचव्यांदा अनिल देशमुख अंमलबजावणी संचालनालयासमोर गैरहजर राहिले आहे. यापूर्वी चारीही वेळेस त्यांचे वकील इन्‍द्रपाल सिंह यांनी ईडी ऑफिसात हजेरी लावली होती. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी देशमुख यांना मोठा झटका दिला. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने देशमुख यांच्या वरील ईडीची चौकशी थांबवण्यास नकार दिला आहे. त्यानंतर देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनरयाचिका दाखल केली आहे.

आज ईडीच्या कार्यालयात आलेल्या अनिल देशमुख यांच्या वकिलांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अनिल देशमुखांना ईडीसमोर हजर राहता येणार नसल्याचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे वकिल इंदरपाल सिंग ईडीच्या कार्यालयात आले होते, त्यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

आम्ही ईडीला काही काळ वाट पाहण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आम्ही याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबावं, अशी भूमिका मांडणारं पत्र आम्ही ईडीला दिलं आहे. तपासामध्ये आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आम्ही चौकशीसाठी हजर राहू”, असं इंदरपाल सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत अनिल देशमुख ईडीच्या समन्स आल्यानंतर देखील हजर राहणार नसल्याचंच त्यांच्या वकिलांनी सूचित केलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Anil Deshmukh Money Laundering Case ED summons files letter of exemption Supreme Court Order news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या