22 November 2024 9:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

स्कॉर्पिओ पार्क तर इनोव्हाच्या घिरट्या | इनोव्हा चालकाने PPE किट वापरल्याची माहिती

Antilia Scorpio, investigation analysis, ATS

मुंबई, ०९ मार्च: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या घराबाहेर स्काॅर्पिओत जिलेटिनच्या छड्या आढळल्याच्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करेल. केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी त्याचे आदेश दिले आहेत. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांचे दहशतवाद प्रतिबंधक पथकच (एटीएस) करेल.

दरम्यान, तपासात एनआयएच्या प्रवेशानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मुंबई पोलिस हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत. यंत्रणा फक्त एका माणसासाठी नाही. गेल्या सरकारमध्येही हीच यंत्रणा होती. तरीही जर केंद्र सरकार हे प्रकरण एनआयएकडे सोपवत असेल तर त्याचा अर्थ काहीतरी गडबड आहे, असाच होईल. जोपर्यंत आम्ही ते उघडकीस आणत नाही, तोपर्यंत आम्ही हार मानणार नाही.

मात्र आता मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कार सोडणाऱ्या व्यक्तीविषयी आणखी एक माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधये मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी स्कॉर्पिओ आणि इनोव्हा अशा दोन गाड्या आल्याचे निष्पन्न झाले होते. यापैकी इनोव्हा गाडीच्या चालकाने आपली ओळख लपवण्यासाठी पीपीई किट वापरल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये या ड्रायव्हरचा चेहरा दिसू शकला नाही.

ही इनोव्हा गाडी दोनदा मुंबईत आली होती. दोन्ही वेळेला ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात गेली होती. त्यामुळे पोलीस आता या माहितीच्याआधारे याप्रकरणाचे आणखी काही धागेदोरे मिळतात का, हे तपासत आहेत.

 

News English Summary: But now another information has come to light about the person who left the car outside Mukesh Ambani’s residence. CCTV footage showed two vehicles, Scorpio and Innova, coming to place explosives outside Mukesh Ambani’s house. It is learned that the driver of the Innova used a PPE kit to hide his identity. So the driver’s face could not be seen in the CCTV footage.

News English Title: Antilia Scorpio matter made some serious investigation analysis news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x