21 January 2025 2:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

रिपब्लिकला धक्का | यापूर्वीचा दिलासा रद्द | गोस्वामींना अटकेपूर्वी ३ दिवस आधी नोटीस द्यावी - हायकोर्ट

Arnab Goswami, ARG Outlier, Mumbai High court, TRP Scam

मुंबई, २४ मार्च: देशातील बहुचर्चित TRP घोटाळ्याप्रकरणी १२ आठवड्यांत तपास पूर्ण करु अशी ग्वाही महाराष्ट्र सरकारने मुंबई हायकोर्टाला दिली आहे. दरम्यान यावेळी हायकोर्टाने रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंबंधी महत्वाचे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयाने अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या वृत्त वाहिनीची मालकी असलेल्या एआरजी आउटलियर मीडिया या कंपनीची याचिका दाखल करुन घेतली. मात्र सुनावणीदरम्यान आतापर्यंत कारवाईपासून दिलेला दिलासा न्यायालयाकडून रद्द करण्यात आला. त्यामुळे हा अर्णब गोस्वामींना धक्का मानला जात आहे.

TRP घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्यासह पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षण द्यावे, प्रकरणाचा तपास केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सीबीआयकडे वर्ग करावा या मागणीसाठी अर्णब गोस्वामी आणि एआरजी आउटलियर मीडिया कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकांवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सध्या नियमित सुनावणी सुरू आहे.

दरम्यान, अर्णब गोस्वामी आणि एआरजी आऊटलीयर कंपनीसंबंधी अटकेची कारवाई करायची असल्यास तीन दिवस आधी नोटीस द्यावी असा आदेश न्यायालयाने बुधवारी सुनावणीदरम्यान दिला आणि त्यामुळे रिपब्लिकला जोरदार धक्का मिळाला आहे. सदर प्रकरणाचा तपास केव्हा पर्यंत पूर्ण करणार हे बुधवारच्या सुनावणीत स्पष्ट करण्याचं न्यायालयाने पोलिसांना आदेश दिले होतं. त्यानुसार महाराष्ट्र सरकारकडून १२ आठवड्यात तपास पूर्ण केल जाईल अशी माहिती देण्यात आल्यानंतर न्यायालयाने संबंधित आदेश दिला.

 

News English Summary: Arnab Goswami and ARG Outlier should be given three days’ notice if they want to be arrested, a court hearing on Wednesday said. The court had directed the police to clarify in the hearing on Wednesday when it would complete the investigation into the case. Accordingly, the court issued the order after the Maharashtra government informed that the investigation would be completed within 12 weeks.

News English Title: Arnab Goswami and ARG Outlier should be given three days notice if they want to be arrested said Mumbai High court news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x