रिपब्लिक TVची ब्रिटनमध्ये द्वेष भडकवणारी भाषा | UK सरकारकडून दंड

मुंबई, २३ डिसेंबर: अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील झटका बसला असून त्याचा अजेंडा देशाबाहेर देखील पकडला जातोय. कारण युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने Worldview Media Network Limited ला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. त्याचं कारण ठरलं ज्यासाठी तो भारतात देखील प्रसिद्ध झाला आहे आणि ते म्हणजे लाईव्ह डिबेटमधुन भडकवणारी भाषा वापरून समाजात द्वेष पसरवनं हे सिद्ध झाले आहे. Arnab Goswamis channel Republic TV fined 20 Lakh by United Kingdom regulator.
रिपब्लिक टीव्हीने ब्रिटनमधील वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्ककडे जबाबदारी आहे. रिपब्लिक टीव्हीला युकेमधील हिंदी भाषिकांपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न आहे. मात्र त्यांच्या गरळ ओकणाऱ्या पत्रकारितेवरून प्रसारणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे.
त्याचं कारण ठरलं आहे ते ६ डिसेंबरला रिपब्लिक भारतचा ‘पूंछता है भारत’ कार्यक्रम प्रसारित करण्यात आलेलं लाईव्ह डिबेट. संबंधित कार्यक्रमात पाकिस्तानी नागरिकांविरोधात द्वेषयुक्त आणि भडकवणारी भाषा वापरत प्रसारणाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कम्युनिकेशन्स नियामक कार्यालयाकडून कारवाईची माहिती देत सांगण्यात आलं आहे की, “ऑफकॉमने चॅनेलला यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितलं असून पुन्हा तो कार्यक्रम प्रसारित न करण्याच्या सूचना केल्या आहेत”.
ऑफकॉमने दिलेल्या माहितीनुसार, “रिपल्बिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींनी भारताच्या चांद्रयान २ मोहिमेसंदर्भात कार्यक्रम करताना भारताच्या अवकाश तसंच तांत्रिक विकासाची पाकिस्तानशी तुलना केली होती. पाकिस्तानकडून भारताविरोध होणाऱ्या दहशतवादी कारवायांचाही त्यात उल्लेख होता”. याच चर्चेदरम्यान अर्णब गोस्वामी आणि सहभागी पाहुण्यांना केलेल्या कमेंट पाकिस्तानी लोकांविरोधात द्वेष निर्माण करणाऱ्या होत्या असं ऑफकॉमने सांगितलं आहे. कार्यक्रमात वारंवार पाकिस्तानी नागरिकांचा उल्लेख दहशतवादी, माकडं, गाढवं, भिकारी आणि चोर असा करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. (Ofcom said the comments made to Arnab Goswami and the guests during the discussion were hateful towards Pakistanis)
“पाकिस्तानचे शास्त्रज्ञ, डॉक्टर, नेते सर्वजण दहशतावादी आहेत. त्यांचे खेळाडूदेखील…तेथील प्रत्येक लहान मूल दहशतवादी आहे. तुम्ही दहशतवाद्यांविरोधात लढत आहात,” असं अर्णब गोस्वामी यांनी कार्यक्रमात म्हटलं होतं असा उल्लेख ऑफकॉमने प्रसिद्धीपत्रकात केला आहे. कार्यक्रमात ‘पाकी’ शब्दाचा उल्लेख केल्याबद्दलही ऑफकॉमने आक्षेप नोंदवला आहे. हा वर्णद्वेषी शब्द असून युकेमधील नागरिकांना मंजूर नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
News English Summary: Arnab Goswami’s Republic TV has now hit the international stage and his agenda is being taken out of the country. Ofcom, the UK’s communications regulator, has fined Worldview Media Network Limited 20,000 pounds (about Rs 19.73 lakh). The reason for this is that it has become famous in India as well and it has been proven to spread hatred in the society by using provocative language from live debates. Republic TV is responsible to the Worldview Media Network in the UK. Republic TV is trying to reach Hindi speakers in the UK through this medium. However, the fine has been imposed for violating the rules of broadcasting due to his vomiting journalism.
News English Title: Arnab Goswamis channel Republic TV fined 20 Lakh by United Kingdom regulator news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल